
केदारनाथ आणि बद्रीनाथ या चारही पवित्र धामांचे दर्शन घेऊन यात्रा पूर्ण केली. या धार्मिक यात्रेमुळे सहभागी भाविकांना आध्यात्मिक समाधान लाभल्याची भावना व्यक्त करण्यात आली. गावातील ग्रामस्थ, युवक आणि भक्तगणांनी यात्रेकरूंचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले. तसेच मल्लिकार्जुन महाराजांच्या कृपेने यात्रा सुखरूप
पार पडल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी सर्व ग्रामस्थांना स्वागत सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. चारधाम यात्रेत सहभागी झालेल्या सर्व सदस्यांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले.



No comments:
Post a Comment