मराठा आरक्षणाचे आंदोलन संपताच मराठा सेवकांनी गाठला रायगड किल्ला! - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Wednesday, 3 September 2025

मराठा आरक्षणाचे आंदोलन संपताच मराठा सेवकांनी गाठला रायगड किल्ला!

धुळे : राज्यात मराठा आरक्षणासाठी विदर्भ, मराठवाड्या सहित उत्तर महाराष्ट्र. व राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो मराठा सेवकांनी मराठा आरक्षणाच् आंदोलन संपताच थेट रायगड किल्ला गाठला असल्याने रायगडावर पुन्हा एकदा जय भवानी ,जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार असो अशा घोषणांनी रायगड पुन्हा एकदा गजबजल्याचे चित्र किल्ले रायगडच्या पायथ्याशी पाहण्यास मिळाले
मुंबईमधील आझाद मैदान येथे २९ ऑगस्ट पासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण चालू केले होते मात्र मराठा आरक्षण उपसमितीने राज्य सरकारच्या वतीने उपोषण करते म्हणून जरांगे पाटील यांना त्यांनी केलेल्या मागण्यांचा प्रस्ताव मान्य केल्याने संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्याने मुंबई पाहून व मुंबईत उपोषणाच्या ठिकाणी वास्तव्य करून माघारी गावी निघालेल्या लाखो मराठा सेवकांपैकी अनेकांनी थेट रायगड किल्ला गाठल्याचे मागील चार दिवसात पाहण्यास मिळाले
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे मराठा समाजाच्या साठी आमरण उपोषण २९ ऑगस्ट पासून चालू केले होते यासाठी विदर्भ ,मराठवाडा सहित, खानदेश ,उत्तर महाराष्ट्र, व पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या ठिकाणावरून लाखो मराठा सेवक मुंबईत दाखल झाले होते 
जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जय कार अशा घोषणांनी रायगड किल्ला मराठा सेवकांनी गजबजला! 
मुंबईतील आझाद मैदान व दक्षिण मुंबईतील बहुतांशी ठिकाणी मराठा सेवकांनी मागील चार दिवसापासून ठाण मांडले होते त्यामुळे दक्षिण मुंबई मुंबईमध्ये पूर्णपणे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती त्यामुळे कामावर जाणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांसहित नोकरदार वर्गाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला२४तासात दक्षिण मुंबई व परिसरातील झालेली वाहतूक कोंडी तातडीने दूर करण्याचे निर्देश दिले मुंबईतून वाहने बाहेर काढण्याचे आव्हान मराठा सेवकांना मनोज जरांगे पाटील यांनी दिल्यानंतर अनेक मराठा सेवक हे मुंबई बाहेर पडून त्यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या रायगड किल्ला गाठणे पसंत केले
मुंबईतील आझाद मैदान येतील संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी आलेल्या मराठा सेवकांची वाहने ही वाशी येथे अडवल्यानंतर अनेकांनी मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण ठिकाणी जाणे शक्य होत नसल्याने त्यातील अनेकांनी आपला मोर्चा थेट रायगड किल्ला इकडे वळवला याबाबत रायगड किल्ला येथील हॉटेल व्यावसायिकांकडून माहिती घेतली असता मागील चार दिवसापासून मोठ्या प्रमाणावर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी आलेले मराठा सेवक हे रायगड किल्ला पाहण्यासाठी आल्याचे . पाचाड येथील स्थानिक हॉटेल व्यवसायिक शिराज  सय्यद यांनी सांगितले

No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!