राज्य बॉक्सिंग पंच परीक्षेत शौकत मुजावर यशस्वी! - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Tuesday, 2 June 2026

राज्य बॉक्सिंग पंच परीक्षेत शौकत मुजावर यशस्वी!

पुणेः महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या शिरपूर, धुळे येथे झालेल्या राज्य पंच व तांत्रिक अधिकारी परीक्षा नुकत्याच संपन्न झाल्या यामध्ये शिरूर तालुक्यातील बेट भाग समजल्या जाणाऱ्या टाकळी हाजी येथील द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा बॉक्सिंग प्रशिक्षक शौकत मुजावर यांनी १ स्टार पंच जज परिक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त केले.
ग्रामीण भागातील खेळांडूना ते नेहमीच स्वसंरक्षणाचे धडे देत असुन त्यांचे अनेक खेळाडू हे राज्य, राष्ट्रीय पातळीवर गाजले आहेत शिरूर तालुक्यातील मा. बापूसाहेब गावडे माध्य उच्चमाध्यमिक विद्यालय टाकळी हाजी, चांडोह, डी. एन .ताठे विद्यालय कारेगाव, जि.प. प्राथमिक शाळा वाघाळे या ठिकाणी प्रशिक्षण देत असुन मृत्युंजय फाईट क्लब इंडिया अध्यक्ष प्रमोद फुलसुंदर तसेच मार्गदर्शक पै. तुकाराम उचाळे यांच्या सहकार्याने तालुक्यातील अनेक विद्यालये, शाळा मध्ये प्रशिक्षण शिबीरे घेण्याचे काम करतात.
आदर्श गुरुवर्य तथा महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन चे महासचिव भरतकुमार व्हावळ तसेच पुणे बॉक्सिंग असो. महासचिव अभिमान सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी बॉक्सिंग खेळाचे धडे घेतले आहेत.
राज्य पंच परिक्षेत यश प्राप्त केल्याने मुजावर यांना द. युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख, महाराष्ट्र अध्यक्ष शकील मणियार, पत्रकार बांधव साहेबराव लोखंडे, अरुणकुमार मोटे, प्रविण गायकवाड, प्रफुल्ल बोंबे, विजय थोरात, प्रदीप रासकर, रविंद्र खुडे, तेजस फडके, योगेश पांचगे साप्ताहिक एक धाडस चे संपादक शरद राजगुरू, मनिषा राजगुरू, योगेश शेंडगे, अक्षय टेमगिरे, शिवबा संघटनेचे डॉ. ओमकार जाधव, हुमन राईट संघटनेचे निलेश रासकर, मिलींद थोरात ग्राहक पंचायत संस्थेचे मान्यवर सदस्य , शिरूर पोलीस स्टेशन, रांजणगाव एम.आय.डीसी .पोलीस स्टेशन, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी मा. बापुसाहेब गावडे विद्यालयाचे प्राचार्य वाघमारे सर्व शिक्षक विविध विद्यालयाचे प्राचार्य शिक्षक सोनेसांगवीचे प्रसिद्ध उद्योजक मल्हारी काळे, पोलीस पाटिल संघटनेच्या उपअध्यक्षा शोभाताई मंदिलकर, पोलीस पाटील सुदर्शन भाकरे, प्रोफेशनल तायक्वांदो ॲकडमी निघोज चे अध्यक्ष विक्रांत रणसिंग यांनी शुभेच्छा दिल्या.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!