आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत बालाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या अभय गुप्ता आंतराष्ट्रीय कराटे स्पर्धेत यशस्वी! - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Friday, 5 June 2026

आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत बालाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या अभय गुप्ता आंतराष्ट्रीय कराटे स्पर्धेत यशस्वी!

 

शिरूर (शेख शौकत मुजावर) : बालाजी इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी अभय समशेर गुप्ता याने नेपाळमधील पोखरा येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत भारतासाठी रौप्यपदक पटकावले. तसेच भारतीय संघाने प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जिंकत देशाचा गौरव वाढविला. अभय हा शिरूर येथील आय. टी.के.बी. कराटे क्लास, रयत ग्राउंड येथे मागील अनेक 

वर्षां पासून कराटेचे प्रशिक्षण घेत आहे. त्याच्या उत्कृष्ट खेळामुळे त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली होती.या यशामागे ग्रँड मास्टर अकबर शेख तसेच कोच फैजान शेख या प्रशिक्षकाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या उल्लेखनीय यशाबद्दल बालाजी इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर च्या शिरापेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. संस्थेचे चेअरमन सदाशिव अण्णा पवार,प्राचार्य विठ्ठल तुपे,शिक्षकवृंद ,पालक वर्गाकडून अभयचे अभिनंदन करण्यात येत आहे.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!