पै.झेंडू पवार यांना मेजर ध्यानचंद राष्ट्रीय "क्रिडा रत्न" पुरस्कार बहाल! - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Monday, 8 September 2025

पै.झेंडू पवार यांना मेजर ध्यानचंद राष्ट्रीय "क्रिडा रत्न" पुरस्कार बहाल!

टाकळी हाजी (शिरूर): क्रिडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षक, मार्गदर्शक, खेळाडू यांना मिशन ऑलंपिक गेम्स असोसिएशन इंडिया,दिल्ली पॅरामेडिकल बोर्ड ( गव्हर्मेंट ऑफ दिल्ली)यांचे वतीने राष्ट्रीय स्तरावरील  मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रिडा रत्न पुरस्कार दिला  जातो. दि.२९ऑगस्ट २०२५ रोजी राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त अण्णापुर गावचे सुपुत्र असंख्य क्रीडा खेळाडूंचे 

मार्गदर्शक,प्रशिक्षक.गुरुवर्य झेंडू पवार सर,मुख्याध्यापक श्रीमती टाकळकर आश्रम शाळा तथा  पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष यांना क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मिशन ऑलंपिक  गेम्स असोसिएशन इंडिया व दिल्ली पॅरामेडिकल बोर्ड गव्हर्मेंट ऑफ दिल्ली यांचे वतीने मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल इतर मागास बहुजन कल्याण विभाग पुणे यांचे वतीने  पहिल्याच भटक्या विमुक्त दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात पैलवान झेंडू पवार सरांना सहा.संचालक संतोषजी हराळे,प्रादेशिक उप संचालक खुशालजी गायकवाड, गायकवाड,सहा.संचालक प्रदीप संकपाळ,माजी संचालक शिक्षण विभाग पवार साहेब,साहित्यिक लेखक भरत विटकर या मान्यवरां च्या हस्ते सन्मानाचिन्ह प्रदान करण्यात आले.

अथक परिश्रम,जिद्द,कष्टाळूपणा ग्रामीण भागातील लाल मातीतील खेळाडू घडविण्याची अविरत धडपड यामुळे शिरूर तालुक्याला असंख्य मल्ल कुस्ती क्षेत्रात नावाजत आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य खेळाडू यशाची शिखरे पार करत त्यांनी राज्य, राष्ट्रीय पातळीवर अनेक पदके मिळवली असून त्यांचे  मार्गदर्शन प्रेरणादायी वारसा हीच त्याच्या यशाचे गमक आहे.त्यांच्या कार्याची दखल म्हणून त्यांना क्रिडा रत्न पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले. त्यांना पुरस्कार प्राप्त होताच श्री. म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार सूर्यकांत पलांडे शिरूर,पुणे जिल्ह्यातील असंख्य खेळाडू मल्ल, क्रिडा शिक्षक, निमगाव म्हाळुंगीतील ग्रामस्थ यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

 

No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!