मराठा आंदोलनाला ऐतिहासिक यश मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांना सरकारची मान्यता - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Tuesday, 2 September 2025

मराठा आंदोलनाला ऐतिहासिक यश मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांना सरकारची मान्यता

मुंबई, दि. २ सप्टेंबर २०२५  (गणेश महाडिक) : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. महाराष्ट्र सरकारने जरांगे यांच्या सात प्रमुख मागण्यांना मान्यता दिल्याची घोषणा केली असून हा निर्णय मराठा समाजाच्या संघर्षाला ऐतिहासिक वळण देणारा ठरला आहे.
मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन छेडले होते. आझाद मैदान, मुंबई येथे सुरू असलेल्या या आंदोलनाला राज्यभरातून लाखो मराठा बांधवांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. गेल्या काही दिवसांपासून आंदोलनामुळे सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता.
सरकारचे महत्त्वपूर्ण निर्णय
सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या निर्णयानुसार  हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेटीयरची अंमलबजावणी होणार. या गॅझेटच्या आधारे मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार.
मराठा आणि कुणबी एकच समाज असल्याची अधिकृत नोंद केली जाईल.
सगे-सोयरेलाही प्रमाणपत्राचा लाभ मिळणार.
आंदोलनादरम्यान बलिदान दिलेल्या कुटुंबियांना नोकरी व आर्थिक मदत दिली जाणार.
आंदोलनकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येणार.
मराठा समाजाला ईडब्ल्यूएसऐवजी स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढण्याचा विचार सुरू आहे.
सरकारच्या निर्णयानंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले,
“हा मराठा समाजाचा ऐतिहासिक विजय आहे. सात मागण्यांपैकी बहुतांश मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. आता सरकारने जीआर काढणे बाकी आहे. जीआर निघाल्यानंतर आम्ही आंदोलन मागे घेऊ.
या निर्णयानंतर मराठा समाजात उत्साहाचे वातावरण आहे. राज्यभरात आनंदाचे जल्लोष सुरू झाले असून आंदोलनकर्त्यांनी हे यश “मराठा समाजाच्या एकतेचा परिपाक” असल्याचे म्हटले आहे.
सरकार आज रात्रीपर्यंत अधिकृत जीआर जारी करणार आहे.
त्यानंतर प्रमाणपत्र वाटप व आरक्षण प्रक्रियेचे काम सुरू होईल.
न्यायालयीन अडचणी टाळण्यासाठी सरकार अध्यादेश काढण्याची तयारी करत आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक इतिहासात महत्वाचे ठरले आहे. समाजाच्या सातत्यपूर्ण संघर्षामुळे आज सरकारला निर्णायक निर्णय घ्यावा लागला. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला यामुळे मोठा विजय मिळाल्याचे मत व्यक्त होत आहे.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!