एक घास मराठा आंदोलकासाठी सरपंच प्रकाश गाजरे यांच्या आवाहनाला पारनेरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Monday, 1 September 2025

एक घास मराठा आंदोलकासाठी सरपंच प्रकाश गाजरे यांच्या आवाहनाला पारनेरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

पारनेर(अरुण बेलकर) : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे आझाद मैदानावर मराठी बांधवांस उपोषण सुरू आहे. मुंबई येथे लाखो मराठा बांधव आंदोलनासाठी दाखल झाले मात्र सरकारच्या धोरणांमुळे आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल होत असल्याचे लक्षात येतात. म्हसोबा झापचे आदर्श सरपंच प्रकाश गाजरे यांनी पारनेर तालुक्यातील जनतेला एक घास मराठा आंदोलकांसाठी आवाहन केले. सरपंच गाजरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील शेकडो मराठा ओबीसी बांधवांनी एकत्रित येत गावागावातून भाकरी, चटणी, लोणचे, पिण्याचे पाणी, फळे जमा करून आंदोलन स्थळी पोहोच केले. सामाजिक राजकीय धार्मिक संघटना यांनी एकत्रित येत सुरू केलेल्या या उपक्रमाचे तालुक्यातील जनतेकडून कौतुक होत आहे.  तालुक्यातील पारनेर शहर टाकळी ढोकेश्वर म्हसोबाझाप पोखरी वारणवाडी भाळवणी नांदूर पठार कारेगाव वडझिरे सुपा कान्हुर पठार हिवरे कोरडा वडगाव आमली अळकुटी निघोज गावांमधून प्रत्येकी दोन  गाड्या मुंबई कडे रवाना झाल्या आहेत.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!