सराफ सुवर्णकार संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष मा. उमेशजी बुऱ्हाडे यांचा “उत्कृष्ट संघटना अध्यक्ष” पुरस्काराने गौरव - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Monday, 25 May 2026

सराफ सुवर्णकार संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष मा. उमेशजी बुऱ्हाडे यांचा “उत्कृष्ट संघटना अध्यक्ष” पुरस्काराने गौरव

पुणे : आज गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे येथे आयोजित भव्य कार्यक्रमात सराफ सुवर्णकार संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष मा. उमेशजी बुऱ्हाडे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक, संघटनात्मक व व्यापारी हिताच्या कार्याबद्दल “उत्कृष्ट संघटना अध्यक्ष” या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नसून संपूर्ण सराफ सुवर्णकार व्यापारी समाजाच्या संघर्ष, एकजूट आणि विश्वासाचा गौरव मानला जात आहे.
मा. उमेशजी बुऱ्हाडे यांनी व्यापारी वर्गाच्या न्यायहक्कांसाठी सातत्याने महाराष्ट्रभर धाव घेत व्यापाऱ्यांच्या समस्या शासनदरबारी मांडल्या. अनेक संकटांच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता व्यापाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांनी न्याय मिळवून देण्यासाठी अथक संघर्ष केला. अन्यायाविरोधात आवाज उठवताना उपोषणासारखे कठोर निर्णय घेण्याची तयारीही त्यांनी दाखवली. त्यांच्या निस्वार्थ समाजकार्यामुळे आणि प्रामाणिक नेतृत्वामुळे आज हजारो व्यापाऱ्यांच्या मनात त्यांच्याबद्दल अपार आदर, विश्वास आणि आपुलकी निर्माण झाली आहे. “खऱ्या अर्थाने संघटनेचा अध्यक्ष कसा असावा, तर तो उमेशजींसारखा,” अशा भावना अनेक व्यापारी बांधवांनी यावेळी व्यक्त केल्या. या कार्यक्रमाला पुणे जिल्हा रिटेल महासंघाचे पदाधिकारी, समितीचे सर्व सदस्य, व्यापारी बांधव तसेच विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षांच्या सत्कारावेळी संपूर्ण सभागृहात अभिमान, उत्साह आणि भावनिक वातावरण निर्माण झाले होते. मा. उमेशजी बुऱ्हाडे साहेबांना पुढील सामाजिक, संघटनात्मक आणि व्यापारी हिताच्या वाटचालीस सर्व व्यापारी बांधवांनी शुभेच्छा दिल्या  असेच व्यापाऱ्यांच्या विश्वासाचे आधारस्तंभ बनून समाजासाठी कार्य करत राहावे, हीच सर्व व्यापारी बांधवांनी अपेक्षा व्यक्त केली.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!