बैठकीदरम्यान बकरी ईद सण शांततापूर्ण व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. सणादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह वक्तव्य अथवा सोशल मीडियावर अफवा पसरविणारे संदेश प्रसारित न करणे, धार्मिक भावना दुखावतील असे कृत्य टाळणे याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच कुर्बानी करताना स्वच्छता राखून नगरपालिका व ग्रामपंचायत नियमांचे पालन करावे, वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच
कोणतीही संशयास्पद व्यक्ती अथवा घटना आढळल्यास तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी उपस्थित सदस्यांनी पोलीस प्रशासनास पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. बकरी ईद सण शांततेत, बंधुभावाने व उत्साहात साजरा करण्यात येईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.





No comments:
Post a Comment