बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शिरूर शहरात पोलिसांचा रूट मार्च - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Wednesday, 27 May 2026

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शिरूर शहरात पोलिसांचा रूट मार्च


शिरूर : आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शिरूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने बुधवारी (दि.२७) सकाळी भव्य रूट मार्च काढण्यात आला. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे तसेच पोलीस प्रशासनाचा वचक दृश्यमान करणे हा या रूट मार्चचा मुख्य उद्देश होता. सकाळी १०.३० वाजता सुरू झालेला हा रूट 
मार्च बीजे कॉर्नर येथून प्रारंभ होऊन राम माळी पाच कंदील चौक, जैन मंदिर, डंबेनाला, सोनार आळी, हलवाई चौक, भाजी बाजार, शनी मंदिर, लाटे आळी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक मार्गे शिरूर पोलीस स्टेशन येथे समाप्त झाला.रूट मार्चदरम्यान पोलिसांनी शहरातील संवेदनशील तसेच गर्दीच्या भागांची विशेष पाहणी केली. तसेच नागरिकांना शांतता, सामाजिक सलोखा आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन 
करण्यात आले. यावेळी नागरिकांनीही पोलीस प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद दिला.या रूट मार्चमध्ये १ पोलीस निरीक्षक, ४ पोलीस उपनिरीक्षक, ४० पोलीस अंमलदार, १ स्ट्राइकिंग फोर्स तसेच १८ होमगार्ड सहभागी झाले होते.संपूर्ण रूट मार्च शांततापूर्ण वातावरणात पार पडला असून शिरूर शहर परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली.




No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!