गुरूदत्त विकास सोसायटी रावडेवाडी चेअरमन पदी एकनाथ दंडवते यांची निवड! - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Wednesday, 20 May 2026

गुरूदत्त विकास सोसायटी रावडेवाडी चेअरमन पदी एकनाथ दंडवते यांची निवड!


पुणे (शेख शौकत मुजावर) :   शिरूर तालुक्यातील बेट भागातील रावडेवाडी येथील गुरुदत्त विकास सोसायटी यांच्या निवडणूका नुकत्याच संपन्न झाल्या. यामध्ये एकनाथ नामदेव दंडवते यांची बिनविरोध चेअरमन पदी निवड झाली तसेच व्हाईस चेअरमन पदी महादू यमन खाडे निवड करण्यात आली. बिनविरोध निवड झाल्यामुळे एकनाथ दंडवते यांनी समाधान व्याक्त करत सोसायटीचा कारभार पारदर्शक करुण सर्व सदस्यांच्या सहकार्याने एक आदर्श सोसायटी बनवण्याचा प्रयत्न करणार आसल्याचे सांगितले.
या निवडीमुळे रावडेवाडी परिसरात आनंद व्याक्त केला आहे. युवा सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण दंडवते, विजय दंडवते यांनी नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचा सत्कार केला, ग्रामीण भागातील खेळाडूंच्या पाठीशी सदैव उभे राहून मिशन मृत्युंजय फाईट क्लब च्या माध्यमातून स्वसंरक्षणाचे डावपेच शिकवत अनेक खेळाडूंना मार्गदर्शन करत ग्रामीण खेळाडूंना राज्य नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या खेळाडूंना सदैव मार्गदर्शन तसेच गावपातळीवर सामाजिक उपक्रम राबविणारे खेळाडू नव्हे तर मार्गदर्शक म्हणून परिचित आसणारे लक्ष्मण दंडवते हे सर्वाचे परिचयाचे आहेत .
या अनुभवी मुरंबी ज्येष्ठ चेअरमन एकनाथ दंडवते तसेच व्हाईस चेअरमन महादू खाडे यांना विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ यांनी शुभेच्छा देत स्वागत केले.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!