
न्हावरे : शिरूर तालुक्यातील निर्वी-न्हावरे मार्गावर झालेल्या भीषण दुचाकी अपघातात एका महिला बँक कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. १३) सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ऋतुजा अनिल बहिरट (वय २९, रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर) असे मृत तरुणीचे नाव आहे. त्या न्हावरे येथील एचडीएफसी बँकेत रोखपाल म्हणून कार्यरत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, ऋतुजा या दररोजप्रमाणे मांडवगण फराटा येथून न्हावरे येथे नोकरीसाठी ये-जा करत होत्या. बुधवारी काम आटोपल्यानंतर त्या दुचाकीवरून घरी परतत असताना निर्वी-न्हावरे रस्त्यावर त्यांचा अपघात झाला. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने न्हावरे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेने नातेवाईकांसह परिसरात शोककळा पसरली आहे.


No comments:
Post a Comment