मैत्री कलेची वसंतराव जगताप - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Tuesday, 29 July 2025

मैत्री कलेची वसंतराव जगताप

    

निर्वी ( शकील मनियार) : काशिनाथ आल्हाट तमाशा अभ्यासक तमाशा पंढरी नारायणगाव बेल्हा तमाशा महोत्सवाचे प्रणेते आमचे मित्र मार्गदर्शक आदरणीय वसंतरावजी जगताप"( अण्णा) यांना वाढदिवसाच्या 
निमित्ताने राज्य  पुरस्कार प्राप्त हलगी सम्राट केरबा पाटील संस्थेच्यावतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा!30 जुलै हा दिवस जगताप अण्णा यांच्या जन्माचा दिवस. या दिवसाचे महत्त्व फार अनमोल आहे.  या  त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने  अनेक मान्यवरांनी जवळपास आठ दिवस अगोदरच शुभेच्छा देण्याचा वर्षाव आणि  शब्द सुमनांचा वर्षाव  केला. यावरून त्यांच्या कर्तृत्वाची  आणि मैत्रीचीजाणीव झाल्याशिवाय राहत नाही .जगताप अण्णा यांचे बोलण्याच्या ओघात नेहमी एक वाक्य असते. "तुम्ही दुसऱ्याला मोठे म्हणा, तुम्हाला  लोक मोठे म्हणतील.,"
'तुम्ही जे पेराल तेच उगवेल' हे साधे बोलणे लोकांशी मैत्री घट्ट करते. संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर हे तमाशा क्षेत्रातील महाराष्ट्रातील गाजलेला, नावाजलेल,  अजरामर नाव आहे.  त्यांच्या पश्चात त्यांच्या कार्याला उजाळा मिळावा . त्यांच्या गाण्याचा आनंद रसिकांना मिळावा.या उद्देशाने आणि ज्या कलाकारांनी बेल्हे गावचा  नावलौकिकात भर  घातली. त्यांच्या कार्याचे  नामस्मरण व्हावें या उद्देशाने बेल्हा तमाशा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्याचे श्रेय जगताप अण्णा  व त्यांच्या सर्व मित्रमंडळाला जाते. मा.वसंतराव जगताप यांची ओळख फक्त  तमाशा महोत्सवाच्या माध्यमातून माझी झाली .या तमाशा महोत्सवात एक भला माणूस, कर्तुत्ववान  माणूस, संयमी माणूस आणि कला संपन्न म्हणून  परिचय झाला .विविध अंगाने  त्यांच्या मैत्रीचे अंग मला दिसले. हे मैत्री घट्ट होऊन गेली. एक परिवारातील  घटक या नात्याने त्यांचे संबंध 
रेशीम धाग्यांनी  विणले गेले. "खरं तर मैत्री कोणाशी करावी? कधी करावी ?आणि का करावी? याचे उत्तम उदाहरण  वसंतराव जगताप आहेत. मैत्रीचे महत्त्व आणि मित्राचे आपल्या जीवनातील स्थान अधोरेखित करायचे असेल. तर तो समजूतदारपणा, सर्वांना  समतेचे वागणूक,  सर्वगुणसंपन्न असे वैभव जगताप अण्णांना जन्मता: मिळाले आहे". जगताप अण्णा भाग्यशाली आहेत. 30 जुलै हा दिवस खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय मैत्री  दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. या दिवसाला  फार महत्त्व आहे. 30 जुलै या दिवशी जन्मलेली मुले ही नेहमी शांतता, सलोखा , संयम  राखणारी तर  तशी ती कलाप्रेमी असतात . हे आपणास जगताप अण्णा यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने दिसून येते. 30 जुलै मैत्रीचा दिवस म्हणजे सर्वांना एकत्रित आणून सर्वांमध्ये भाव निर्माण करणारा ,सर्वांना आनंद देणारा असा दिवस. जगताप अण्णा यांच्या भाग्याला मिळाला. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बेल्हा तमाशा महोत्सव सुरू केला. तो आनंददायी कसा होईल असे नियोजन केले जाते.आज तो महोत्सव  महाराष्ट्रातील गावागावात पोहोचला आहे . 30 जुलै रोजी अनेक प्रसिद्ध असे मान्यवर  जन्माला आले त्यापैकी जर्मनचे उद्योगपती जॉर्ज विल हेम फॉन सिमेन्स, एक भारतीय महान गायक . तो गायक म्हणजे सोनू निगम एक भारतीय पार्श्वगायक, संगीत निर्देशक आणि अभिनेता  सोनू निगम यांचा  परीचय संपूर्ण महाराष्ट्राला  सोनू निगमने पहिले गाणे गायले होते. 'ओ आसमानवाले'.... आणि  जगताप अण्णांनी गाणे गायले ते संगीतरत्न दत्ता महाडिक यांनी गायलेले गाणे.  वसंतराव जगताप यांनी सहकार्याच्या क्षेत्रातील स्वतःची ओळख करून  अनेकांचे संसार संपन्न करण्याचे काम केले आहे.त्यांच्या कर्तुत्वामुळे  सामान्य माणसाच्या  मनामध्ये एक मैत्रिणी पूर्ण मैत्री पूर्ण नाव जर कोणाचे ते वसंतरावजी जगताप हेच आहे. त्यांचे नाव तमाशा कलावंत आणि तमाशा रसिकांच्या मनामध्ये घर केले आहे.  खरं तर ! त्यांच्या सहवासात कमी क्षण येतात. तो सहवास नेहमी  आनंद देतो.
जगताप (अण्णा) वाढदिवसाच्या निमित्ताने , आपणास  उदंड आयुष्य लाभो"! या सगळ्या  यानिमित्ताने परमेश्वराकडे एकच मागणे मागेल. या माझ्या  मित्राला अहंकाराची बाधा होवू देवू नको. संत नामदेवांच्या वचनाप्रमाणे... "अहंकाराचा वारा न लागो राजसा |
माझ्या विष्णुदासा भाविकांसी||
नामा म्हणे तयां असावे कल्याण|
ज्या मुखी निधान पांडुरंग"||


No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!