राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत टाकळी हाजीचे खेळाडू चमकले! - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Monday, 28 July 2025

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत टाकळी हाजीचे खेळाडू चमकले!

टाकळी हाजी (शेख शौकत मुजावर) : खेळाडूंनच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून साई मल्हार शोतोकॉन कराटे डो असो.ऑफ इंडिया अयोजीत राज्यस्तरीय कराटे स्पर्धा संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक कैलास महानोर यांच्या मार्गदर्शनाखाली वरवंड दौंड येथे नुकत्याच संपन्न झाल्या.या स्पर्धेत राज्यातील असंख्य खेळाडूनी सहभाग घेतला.
यामध्ये टाकळी हाजी,कवठे यमाई येथील विविध विद्यालय, शाळा मध्ये शिक्षण घेणारे खेळाडू तसेच त्यांना स्वसंरक्षण प्रशिक्षण देणारी मृत्युंजय फाईट क्लब ऑफ इंडिया यांच्या प्रयत्नांने या खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत ८ सुवर्ण पदक ५ रजत पदक प्राप्त करत आपल्या गावासह विद्यालय,शाळेचे नाव उंचावले.
जि.प.प्राथ शाळा उचाळे वस्ती तेजस प्रविण पोकळे सुवर्ण पदक जि.प.प्राथ शाळा मांडव ओव्हळ वस्ती माहिन शौकत मुजावर रजत पदक,मा.बापूसाहेब गावडे विद्यालय टाकळी हाजी चे सोहम दत्तात्रय गावडे सुवर्ण पदक,तनिशा शौकत मुजावर सुवर्ण पदक,मिजबा शौकत मुजावर सुवर्ण पदक, अदिराज दिपक गव्हाणे रजत पदक,
श्री.मुलिकादेवी विद्यालय निघोज ता.पारनेर प्रज्योत बदेश पोकळे सुवर्ण पदक, श्री.बालाजी इंग्लिश मेडी.स्कूल शिरूर श्रवण विनोद बोखारे सुवर्ण पदक तसेच कवठे यमाई येथील न्यु इंग्लिश स्कुल मधील अनुष्का संतोष गोसावी सुवर्ण पदक,ओम संतोष देशमुख सुवर्ण पदक,प्रगती मुंकूद पोकळे,आशुतोष मुकूंद पोकळे देवदत्त अजित सरोदे यांनी रजत पदक प्राप्त केले.
या सर्व खेळाडूना मृत्युजंय फाईट क्लब चे संस्थापक अध्यक्ष प्रमोदजी फुलसुंदर,मार्गदर्शक हॉटेल विश्व पॅलेस उदयोग समुहाचे अध्यक्ष पै.तुकारामभाऊ उचाळे प्रशिक्षिक शौकत मुजावर,अक्षय पवार यांनी प्रशिक्षित केले.
खेळाडूंना मुख्याध्यापक जे.टिकले सर,प्राचार्य वाघमारे,अजीत गावडे सर,प्रविण पोकळे,विनोद बोखारे, दत्तात्रय गावडे टाकळी हाजीच्या पोलीस पाटील शोभाताई मंदिलकर,
पालक,शिक्षक,ग्रामस्थ यांनी शुभेच्छा देत स्वागत केले.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!