
टाकळी हाजी (शेख शौकत मुजावर) : द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य आयोजीत राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आहिल्यानगर येथे नुकताच संपन्न झाला. राज्यस्तरीय पुरस्कार सोहाळ्यात चऱ्होळी पुणे येथील खेळ जगतात ग्रामीण भागात किक बॉक्सिंग खेळाच्या माध्यमातून ठसा
उमवटून असंख्य ग्रामीण भागातील खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडूना प्रोत्साहन देत देशपातळीवर खेळवून देशाचे प्रतिनिधित्व करत देशाला खेळाडूंच्या माध्यमातून अनेक पदके जिकूंन आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या खेळ विश्वातील आदर्श व्याक्तिमहत्व आसणारे लाखो खेळाडूंचे आवडते गुरुवर्य सतिश राजहंस यांच्या कार्याची दखल घेत राज्यस्तरीय खेलरत्न पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी सतिश राजहंस यांनी द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र यांचे २९ जिल्ह्यातील साडेआकरा हजार ग्रामीण भागातील विविध दैनिकांच्या पत्रकारांचे आभार मानत पत्रकार संघांने त्यांच्या कार्याची दखल घेत राज्यस्तरीय
खेलरत्न पुरस्कार देत पाठीवर आपुलकीची थाप दिल्याने गहिवरत मनोगत व्यक्त करत किकबॉक्सिंग खेळ महाराष्ट्रात प्रसार प्रचार व्हावा म्हणून माझ्यासह किकबॉक्सिंग स्पोर्टस असो. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष निलेश शेलार यांना प्रसिद्धीच्या माध्यमातून सदैव सहकार्य करण्याची विनंती केली.
त्यांना पुरस्कार प्राप्त झाल्याने महाराष्ट्रातील किकबॉक्सिंग खेळाच्या खेळाडूना एक आशेचा किरण दिसला असुन पत्रकार बांधव हे खेळाडूंच्या चांगल्या कार्याची सदैव दखल घेतात हे जाणवले.
द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख पत्रकार शेख शौकत मुजावर पुणे जिल्हा अध्यक्ष शकील मणियार किकबॉक्सिंग स्पोर्टस असोसेशन महाराष्ट्र अध्यक्ष निलेश शेलार, वाको इंडिया महाराष्ट्र सचिव धीरज वाघमारे,वरिष्ठ उपअध्यक्ष सूर्यप्रकाश मुंडापात,उपाध्यक्ष अनिल मिरकर, उपाध्यक्ष रणजीत कताडे,उपाध्यक्ष कृष्णा ढोबळे, सहसचिव विशाल सिंग,सहसचिव शुभम मिश्रा आंतरराष्ट्रीय पंच मकरंद जोशी, शिवानी राजहंस,मुंबई शहर अध्यक्ष उमेश मुरकर,पुणे शहर
अध्यक्ष रुपेश परदेशी,सचिव ओमकार राठोड,पिंपरी चिंचवड शहराचे कार्याध्यक्ष शुभम कानडे,अध्यक्ष प्रकाश बोईनवाड,पुणे ग्रामीण उपाध्यक्ष प्रतिक नेवसे,दिपक गायकवाड,सुभाष दाभाडे, प्रा.कैलास महानोर,नागेश काळभोर, राणी टाकळकर,नितीन वैरागर, जयंत कसबे सह असंख्य पंच,कोच, खेळाडूंनी शुभेच्छा देत स्वागत केले.
No comments:
Post a Comment