राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत कु.उत्कर्षा शिंदे अव्वल! वर्ल्ड कप किकबॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेस पात्र . - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Wednesday, 24 June 2026

राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत कु.उत्कर्षा शिंदे अव्वल! वर्ल्ड कप किकबॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेस पात्र .


मुंबईः (शेख शौकत मुजावर)  : वाको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशन  मार्फत मध्यप्रदेश इंदोर येथे दिनांक १७ जून ते २१ जून २०२६ रोजी आयोजित राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र किक बॉक्सिंग स्पोर्टस असोसिएशन यांनी निवडलेल्या पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील राहू येथील कैलास विद्या मंदिर शाळेत इयत्ता आठवी मध्ये शिकणाऱ्या कुमारी उत्कर्षा रणजीत शिंदे हिने राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत बहारदार प्रदर्शन करत १ सुवर्ण पदक ,१ रजत पदक प्राप्त करत महाराष्ट्र राज्याचा नाव लौकिक वाढवत इटलीमध्ये  होणाऱ्या वर्ल्ड कप चॅम्पियनशिप किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये आपले स्थान प्राप्त केले आहे.
महाराष्ट्राची ग्रामीण भागातील कन्या ही साता समुद्रा पलीकडे गरुड झेप घेत देशासाठी खेळणार असल्याचे उत्कर्षा शिंदे हिच्या पाठीशी प्रत्येक वेळी उभे राहणारे आधारवड आजोबा सुखदेव दौलत शिंदे यांनी सांगितले . उत्कर्षा शिंदे हिने कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर महाराष्ट्र राज्यात झालेल्या विविध 
किकबॉक्सिंग स्पर्धांमध्ये १२ सुवर्णपदक ,५ रजत पदक , ६ कास्य पदक प्राप्त केले असून चेन्नई येथील २०२५ रोजीच्या राष्ट्रीय स्पर्धेत १ सुवर्ण पदक,१ रजत पदक तसेच दिल्लीमध्ये झालेल्या आंतराष्ट्रीय स्पर्धेत सलग दोन वर्षे  २ सुवर्ण ,२ रजत पदक प्राप्त केले . भारत सरकार क्रीडा मंत्रालय द्वारा आयोजित खेलो इंडिया किक बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात ६ सुवर्ण पदक तर इंदोर येथे आयोजित वेस्ट झोन खेलो इंडिया किक बॉक्सिंग स्पर्धेत १ सुवर्ण पदक प्राप्त करत सुवर्ण कन्येचा मान पटकविला. या यशामागे किकबॉक्सिंग स्पोर्टस 
असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष निलेश शेलार तिला प्रशिक्षित प्रशिक्षित करणारे आंतरराष्ट्रीय कोच तथा महाराष्ट्र ततामी चेअरमन गुरुवर्य सतीश राजहंस, आंतरराष्ट्रीय पंच शिवानी राजहंस कोच श्रावणी राजहंस, तसेच स्टेडियमवर वेळो वेळी सूचना देणारे आंतरराष्ट्रीय खेळाडू ओंकार राठोड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .इटली येथे होणाऱ्या वर्ल्ड कप किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी कैलास विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकवृद,समस्त ग्रामस्थ, आई वडील, चुलता चुलती,नातेवाईक यांनी उत्कर्षा शिंदे हिला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!