मुंबई (शेख शौकत मुजावर) : महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने शिरपूर, धुळे येथे झालेल्या राज्य पंच व तांत्रिक अधिकारी परीक्षा नुकत्याच संपन्न झाल्या. यामध्ये संपूर्ण राज्यातुन मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. यामध्ये पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे महासचिव व राष्ट्रीय पंच अभिमान सुर्यवंशी यांनी तांत्रिक अधिकारी परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त करत अव्वल स्थान प्राप्त केल्याबद्दल पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष व महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे माजी उपाध्यक्ष ॲड. विजय भगत, महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे महासचिव भरतकुमार व्हावळ, शिवछत्रपती पुरस्कार विजेते पिंपरी चिंचवड शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव विजय यादव, आंतरराष्ट्रीय कोच व पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव विजय गुजर, इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विशेष सत्कार करून सन्मानित करण्यात आले.
ग्रामीण भागातील खेळांडूना ते नेहमीच स्वसंरक्षणाचे धडे देत असुन त्यांचे अनेक खेळाडू हे राज्य, राष्ट्रीय पातळीवर गाजले आहेत.
राज्य तांत्रिक अधिकारी परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेले आभिमान सुर्यवंशी हे पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे महासचिव तसेच राज्य संघटनेच्या रेफरी जज कमिशनचे सचिव व राष्ट्रीय पंच / कोच असून त्यांना "उद्धवश्री क्रिडा पुरस्कार २०२५", तसेच राष्ट्रीय स्तर बॉक्सिंग स्पर्धेमध्ये २०२४ मध्ये "बेस्ट रेफरी" पुरस्कार, राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आठ वेळा "बेस्ट रेफरी" पुरस्कार मिळाला असून त्यांनी सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चे सलग १५ वर्षे उत्कृष्ठ बॉक्सिंग कोच म्हणून जबाबदारी यशस्वी रित्या पार पाडली, व त्या
बरोबरच ७ वर्षे सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बॉक्सिंग निवड समिती सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल, शिवाजीनगर येथे ते बॉक्सिंग कोच म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय बॉक्सर कोचेस व पंच घडवले असून संघटन, नम्रता व संभाषण कौशल्य यांच्या जोरावर खेल जगतात त्यांनी विशेष ठसा उमटवला आहे.
त्यांना महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष नामदार प्रविणभाऊ दरेकर, आजीव अध्यक्ष जय कवळी, कार्याध्यक्ष विठ्ठलराव लोखंडकार, महासचिव भरतकुमार व्हावळ, रेफरी जज कमिशन चेअरमन एकनाथ चव्हाण, आंतरराष्ट्रीय रेफ्री जज RJCCP कमिशन चेअरमन कॅप्टन सुरेश कदम, महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना, पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना,
पुणे शहर बॉक्सिंग संघटना, पिंपरी चिंचवड शहर बॉक्सिंग संघटना, सिटीझन जस्टीस प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र पत्रकार संघ, द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य,अनेक संघटना, स्पोर्ट क्लब, बॉक्सर खेळाडून कडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
No comments:
Post a Comment