साक्री तालुक्यातील प्रतापपूर येथे एक गाव एक गणपती सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्साहाचा जल्लोष - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Friday, 5 September 2025

साक्री तालुक्यातील प्रतापपूर येथे एक गाव एक गणपती सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्साहाचा जल्लोष

धुळे : गोपाल कृष्ण गणेश मित्र मंडळाच्या वतीने प्रतापपूर गावात गणेश विसर्जन मिरवणूक अत्यंत उत्साह, आनंद आणि भक्तिभावाने पार पडली. सकाळपासूनच गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. संध्याकाळनंतर सुरू झालेल्या मिरवणुकीत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले राजकमल बँड सटाणा यांचे सुरेल वादन तसेच आकर्षक विद्युत रोषणाई. भव्य फटाक्यांची आतषबाजी होताच वातावरण जल्लोषमय झाले.  आणि “गणपती बाप्पा मोरया” च्या घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेले.
गावातील लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. गावात एकात्मतेचे आणि श्रद्धेचे दर्शन या मिरवणुकीत घडले.
मिरवणूक यशस्वी पार पाडण्यात मंडळाचे आयोजक श्री. धनराज गांगुर्डे, श्री. जितेंद्र गांगुर्डे, श्री विनोद गांगुर्डे श्री हर्षल ठाकरे , श्री सुधीर गांगुर्डे, श्री भूषण गांगुर्डे, श्री भूषण ठाकरे तसेच मंडळाचे अध्यक्ष श्री पराग गांगुर्डे, श्री मनोज शिंदे तसेच सागर गांगुर्डे, अनिल गांगुर्डे, अमोल ठाकरे, कल्पेश गांगुर्डे, सचिन गांगुर्डे, चेतक गांगुर्डे, विशाल कुवर, चेतन गांगुर्डे, भूपेश शिंदे, दुर्गेश शिंदे, तुषार गांगुर्डे यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांनी सर्व ग्रामस्थांचे सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले.
सुरक्षित आणि सुरळीत विसर्जन मिरवणुकीसाठी साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. दीपक वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिस्तबद्ध आणि शांततेत मिरवणूक पार पाडल्याबद्दल ग्रामस्थांनीही पोलीस प्रशासनाचे आभार मानले.
गणेशोत्सवाच्या सात दिवसांत गावात भक्तिभावाचे वातावरण अनुभवायला मिळाले. विसर्जनाच्या मिरवणुकीने उत्सवाचा भव्य समारोप झाला.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!