नेपाळ येथील इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत शिरूर चे खेळाडू यशस्वी! - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Friday, 5 June 2026

नेपाळ येथील इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत शिरूर चे खेळाडू यशस्वी!


पुणे (शेख शौकत मुजावर) :  इंटरनॅशनल कराटे स्पर्धा नेपाळमधीत पोखरामध्ये नुकत्याच संपन्न झाल्या. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्हयातून शिरूर येथील खेळाडू संघ शिरूर तायक्वांडो  किक बॉक्सिंग (l.T. K.B.) यांनी सर्वात जास्त पदके जिकून महाराष्ट्र संघाला विजय मिळवून देत प्रथम क्रमांकाचा चषक जिंकला .महाराष्ट्रातून जवळपास १००ते १२५ खेळाडूनी इंटरनॅशनल कराटे स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये सर्वाधिक मुले व मुली शिरूर  ( I.T.K.B ) कराटे क्लासचे असल्याने शिरूर कराटे संघाने तब्बल १७ सुवर्णपदक,९ रौप्य पदक अशी २६ पदके जिंकून धुवाधार विजय मिळवत प्रथम क्रमांकाच्या चषककाचे मानकरी ठरले . 


सुवर्ण पदक विजेते :ग्रंथाली लटके, ओवी बोबडे, आरोही मोगरे,सृष्टी जगताप, समृद्धी महामुनी, गौरी वाखारे, हर्षल वाळुंज, दिव्यांका वाळुंज, वेदिका सपकाळ, श्रीजन रेड्डी, देवांश औटी, शौर्य लोंडे, कल्पक इसवे, 

श्लोक रासकर, साईराज गुगळे, सुहैब शेख. मास्टर अकबर शेख यांची कन्या तनाज हीने आपली दमदार चुनूक दाखवत सुवर्ण पदकाची मानकरी ठरली . रौप्य पदक विजेते :स्पृहा जाधव, आदिती टोपे, विनया भंडारी, श्रीनिवास रेड्डी, भावेश वाखारे, शोयब शेख, अभय गुप्ता, श्रेणिक कोठारी, श्रेयश चिकने.

शिरूर शहर तसेच पंचक्रोशीतुन विजयी खेळाडून वर अभिनंदनाचा वर्षाव होत असुन पालकांनी आपल्या पाल्यांच्या खेळ क्षेत्रात उज्वल भविष्या घडावे म्हणून क्लास ला भेट देवून नवीन ॲडमिशनसाठी संपर्क क्रमांक ७६६६८५०६८५ करण्याचे आव्हान अकबर शेख यांनी केले आहे. सर्व यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक ग्रँड मास्टर अकबर शेख आणि फैजान शेख यांनी मोलाचे मार्गदर्शन करत प्रशिक्षित केले.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!