
पुणे (शेख शौकत मुजावर) : महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या शिरपूर, धुळे येथे झालेल्या राज्य पंच व तांत्रिक अधिकारी परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या पंचांचा विशेष सत्कार सोहळा पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार ॲड . गौतम चाबुकस्वार यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ बॉक्सिंग संघटक ॲड .विजय भगत यांच्या हस्ते पिंपरी (पुणे) येथे नुकताच संपन्न झाला.
महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे महासचिव व पुणे जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष भरतकुमार व्हावळ यांनी राज्य पंच व तांत्रिक अधिकारी परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या सर्व पंचांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना कायम निष्पक्षपाती पणे निर्णय दिला जाणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन करत महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन ला शंभर वर्षाची जुनी परंपरा असुन राज्यातील सर्वात जुनी क्रीडा संघटना असल्याचे सांगितले .
राज्य पंच परिक्षेत पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे यशस्वी पंच पुढीलप्रमाणे:
▪️आसिफ अनिस शेख, अनिकेत जामदार, अमन शर्मा, रवि गायकवाड, शौकत मुजावर.
▪️ आसिफ रुक्नुद्दीन शेख, विनोंद कुंजीर.
▪️राज्य तांत्रिक अधिकारी: अभिमान सुर्यवंशी
या कार्यक्रमास शिवछत्रपती पुरस्कार विजेते महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे विभागीय सचिव व पिंपरी चिंचवड शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव विजय यादव, पुणे जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष कुणाल राजगुरू, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव तथा आंतरराष्ट्रीय कोच विजय गुजर,
उपाध्यक्ष सुरेश गायकवाड, पिंपरी चिंचवड शहर संघटनेचे सहसचिव मनोज यादव, पुणे शहर संघटनेचे समन्वयक प्रदीप वाघे, पुणे जिल्हा मेडीकल कमिशन चेअरमन डॉ. दिलीप डाळींबे, महिला समिती प्रमुख सौ.चेतना वारे, शिवमुद्रा स्पोर्टस क्लब फुरसुंगी चे तुषार पवार हे मान्यवर उपस्थित होते.
पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे महासचिव राष्ट्रीय पंच अभिमान सुर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व जिल्हा संघटनेचे सदस्य अमोल धनावडे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
No comments:
Post a Comment