
शिरूर (शेख शौकत मुजावर) : बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बालाजी इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएससी ),बालाजी प्राथ. माध्य.विद्यालय( सेमी इंग्लिश) या विद्यालयांमध्ये ७९ वा. स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सर्वप्रथम मान्यवरांचे लेझीम,ढोल ताशांच्या गजरा स्वागत करण्यात आले.कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदाशिव आण्णा पवार तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले रो.शितल शाह,कॅप्टन विठ्ठलराव वराळ,रो.विवेक दिक्षित,रोटरियन मिलिंद महाराज भोसुरे,सरपंच सौ. शिल्पा गायकवाड बालाजी प्राथ. माध्य.विद्यालयाचे प्रा.विनायक म्हसवडे,बालाजी इंग्लिश मीडियम
स्कूलचे प्रा.मनमित चौरे,रामलिंगचे मा.सरपंच विठ्ठलराव घावटे,सरपंच शिल्पाताई गायकवाड आदर्श सरपंच अरुणराव घावटे,मा.सरपंच नामदेवराव जाधव,बाळासाहेब देंडगे (ग्राम.सदस्य),दोन्ही विद्यालयाचे पालक शिक्षक संघाचे सदस्य,सर्व शिक्षक,विद्यार्थी यांच्या समवेत शाळेच्या प्रांगणात सकाळी ८.१५ वा.ध्वजारोहण करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी स्काऊट गाईडच्या मार्च पास द्वारे ध्वजाला मानवंदना दिली.संस्थेच्या अध्यक्षांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा शाल,श्रीफळ पुष्पगुच्छ,सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी देशावरील प्रेम आपल्या भाषणातून व्यक्त केले.देशभक्तीपर गीते गायली.विद्यार्थी नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात.मंथन प्रज्ञाशोध परीक्षेतील तसेच समूहगीत स्पर्धेत ट्रॉफी मिळवलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. दोन्ही विद्यालयातील प्राचार्यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यालयाची माहिती दिली.प्रमुख पाहुणे विठ्ठल वराळ यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना देशभक्तीचे शिक्षण आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व पटवून दिले.विनायक दीक्षित आणि प्रमुख पाहुणे शितल शहा यांनीही राष्ट्रप्रेम जागृत करणारे मनोगत व्यक्त केले.

विद्यार्थ्यांनी काही निवडक देशभक्तीपर गीते,सांस्कृतिक कार्यक्रम कवायत सादर करत बालनाटिका सादर करून देश प्रेमाची शिकवण दिली . कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष सदाशिव अण्णा पवार यांनी देशभक्ती,स्वच्छता,पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक सलोखा यावर भर देण्याचे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बालाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिपीका स्वाती चत्तर, प्रणिता शेळके,सोनाली परदेशी सुनंदा देवीकर,शबाना शेख,सर्व शिक्षक,कर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी पार पाडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा बांदल, ललिता पोंदे,जयश्री उमाप यांनी केले.पाहुण्यांचा परिचय शितल बांदल यांनी करून दिला तसेच प्रणिता शेळके यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
No comments:
Post a Comment