गुरुवर्य सतिश राजहंस चऱ्होली भुषण पुरस्काराने सन्मानित! - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Saturday, 16 August 2025

गुरुवर्य सतिश राजहंस चऱ्होली भुषण पुरस्काराने सन्मानित!

टाकळी हाजी (शेख शौकत मुजावर) : किसन महाराज तापकिर सोशल एज्युकेशनल ट्रस्ट आयोजित दहीहंडी उत्सव २०२५ नुकताच पुणे येथील चऱ्होली येथे नुकताच मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
यामध्ये किकबॉक्सिंग स्पोर्टस असो. पुणे जिल्हाअध्यक्ष गुरुवर्य 
सतिश राजहंस यांनी केलेल्या ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहान, आंतराष्ट्रीय स्तरापर्यत असंख्य खेळाडूंना प्रशिक्षण देत देशासाठी अनेक पदके मिळवून देण्यासाठी केलेले मार्गदर्शन या कार्याची पावती म्हणून त्यांना चऱ्होली भुषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.त्यांना यापूर्वी खेळ क्षेत्रातील" खेलरत्न" राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठिमागे हा त्याच्या अर्धांगिनीचा हात आसतो. माझ्या यशामागे माझी पत्नी सौ सारिका राजहंस व माझ्या दोन कन्यारत्न शिवानी, श्रावणी सह माझ्या आई वडीलांचा आशिर्वाद असल्याचे गुरुवर्य सतिश राजहंस यांनी सांगितले.
कार्यक्रमा प्रसंगी महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम शिवाली परब , मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित, कालिंदी, मा. महापौर अप्पा काळजे , मा. नगरसेवक सचिन भाऊ तापकीर, युवा उद्योजक बजरंग काळजे मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त झाल्याने महाराष्ट्रातील किकबॉक्सिंग खेळाच्या खेळाडूंनी त्यांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!