तळवाडे भामेर पोहोच कालव्याची सखोल चौकशी होऊन धरणात पाणी पडावे यासाठी तळवाडे भामेर येथील शेतकऱ्याचे उपोषण. - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Thursday, 21 August 2025

तळवाडे भामेर पोहोच कालव्याची सखोल चौकशी होऊन धरणात पाणी पडावे यासाठी तळवाडे भामेर येथील शेतकऱ्याचे उपोषण.

धुळे(चंद्रशेखर अहिरराव) : तालुक्यातील समस्त ग्रामस्थ मौजे तळवाडे भामेरगत ४५ वर्षांपासून प्रलंबित असलेला तळवाडे भामेर पोहोच कालवा शासनाने वेळोवेळी निधी उपलब्ध करुन देखील राजकिय वरदहस्तामुळे पुर्ण होऊ शकला नाही. खरिप हंगामातील नैसर्गिक पुरपाणी कठगड ( हरणबारी) बंधायातुन सोडून हे थरण भरण्याची तरतूद मंजूर आहे. परंतु काम अपूर्ण असल्याने ही समस्या प्रतिक्षेत आहे.आता खरिप हंगाम दोन महिने बाकि असतांना लाखो लिटर पाणी मोसम नदिपात्रात सोडले जात आहे.तेच पाणी तळवाडे धरणात आले तर सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल.

तसेच तळवाडे भामेर धरणात जनजीवन योजनेअंतर्गत दोन विहिरी चिराई, राहूड, वघानेपाडा गांवासाठी खोदल्या गेल्या त्या अनधिकृत जागेवर असुन, तळवाडे ग्रामस्थांना विश्वासात न घेता संगनमताने खोदलेल्या आहेत. तळवाडे भामेर धरण ते वाटोळी नाला याकरिता उपकालवा काढण्यात आला. परंतु कालव्यात गेलेल्या बागायती जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना प्राप्त झाला नाही. या सर्व बाबींची शहानिशा करुन समिती गठित करुन सखोल चौकशी व्हावी. म्हणून दि. २१/८/२०२५ वार गुरुवार रोजी गावातील समाजसेवक व बाधीत शेतकरी धरणाजवळ आमरण उपोषणास बसणार आहेत. अशी गांवपातळीवर बैठक देखील घेण्यात आली. तरी आपण या बाबींची योग्य दखल घेऊन चौकशी करावी हि माफक अपेक्षा.



 

No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!