
टाकळी हाजी (शेख शौकत) : राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धा हिमाचल प्रदेश या ठिकाणी सप्टेंबर महिन्यात होणार असून महाराष्ट्रातील निवड झालेले खेळाडू या स्पर्धेस सहभागी होणार असुन किकबॉक्सिंग स्पोर्टस असो. महाराष्ट्र अध्यक्ष निलेश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली हे खेळाडू जाणार आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील बेट भाग म्हणून समजणाऱ्या जाणाऱ्या टाकळी हाजी 
येथील मा. बापुसाहेब गावडे माध्य. विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मिजबा शौकत मुजावर, तनिशा शौकत मुजावर, जि.प.प्राथ.शाळा मांडव ओव्हळ वस्ती येथील माहिन शौकत मुजावर या तिन सख्या बहिणीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांनी आपली चुणूक दाखवत शाळेसह गावचे नाव राज्यपातळीवर गाजवले आहे. त्यांच्या निवडीने ग्रामीण भागातील खेळाडू देखील राष्ट्रीय पातळीवर जावू शकतो हा संदेश पोहचत आहे या खेळाडूंना किकबॉक्सिंग स्पोर्टस असो. पुणे जिल्हा अध्यक्ष सतिश राजहंस सरांनचे मार्गदर्शन तसेच मृत्युंजय फाईट क्लबचे संस्थापक प्रमोद फुलसुंदर हॉटेल विश्व पॅलेस उदयोग समुहाचे अध्यक्ष पै. तुकाराम उचाळे प्रशिक्षक शेख शौकत मुजावर, विक्रांत रणसिंग प्रशिक्षण देत आहेत. ग्रामीण भागातील या गरिब कुटूबातील खेळाडूंना राष्ट्रीय
स्तरावर खेळतात ही कौतुक स्पद आसल्याचे शिनगरवाडी चे सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान खांबकर यांनी सांगितले. ग्रामीण भागातील शिनगरवाडी टाकळी हाजी येथील या खेळाडूंना शिरूर, रांजणगाव एम.आय.डीसी, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी तसेच कर्मचारी, टाकळी हाजीचे विद्यमान सरपंच अरुणाताई दामूशेठ घोडे सर्व सदस्य मा.बापूसाहेब गावडे विद्यालयाचे प्राचार्य वाघमारे,अजित गावडे, युवा उद्योजक प्रशांत चोरे, द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख, पुणे जिल्हाअध्यक्ष शकील मणियार, दै. लोकशक्ती न्युजचे कार्य.संपादक इम्रान शेख, प्रसिद्ध उदयोजक कमलेश बुराडे,पोलीस पाटील शोभाताई मंदिलकर,निलकंठ बोरकर,पै.रखमा कोळपे अशिष कुलकर्णी,पै.अनिल धनगर,शंकर ननावरे, विनोद बोखारे, धोंडीभाऊ जाधव,पोलीस मित्र धोंडीभाऊ गावडे, पत्रकार बांधव साहेबराव लोंखडे,विजय थोरात, शुभम वाघचौरे, सुजित मैड,योगेश भाकरे,प्रविण गायकवाड, संजय बारहाते,अरुणकुमार मोटे सह पत्रकार, मित्रपरिवार, ग्रामस्त यांनी शुभेच्छा दिल्या.


No comments:
Post a Comment