दौंड मध्ये विविध सामाजिक कार्यक्रम घेऊन साहित्य सम्राट डॉ.आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Tuesday, 5 August 2025

दौंड मध्ये विविध सामाजिक कार्यक्रम घेऊन साहित्य सम्राट डॉ.आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

दौंड (अतिश जगताप) : दौंड शहरामध्ये विश्वविख्यात साहित्यसम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची यांची 105 वी जयंती दौंड शहरांमध्ये विविध प्रकारचे सामाजिक कार्यक्रम घेऊन जल्लोषात साजरी करण्यात आली. नितीन तूपसौंदर्य -लहुजी यंग  ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष, यांच्या 
नेतृत्वाखाली विश्वविख्यात,साहित्यसम्राट, डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रंजीत खंडागळे यांचा गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. रणजीत खंडागळे यांच्या प्रबोधनात्मक गायनाने उपस्थितांची मने भारावून गेली.
त्याचप्रमाणे या कार्यक्रमांतर्गत विश्वविख्यात साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त   समाज भूषण पुरस्काराचे आयोजन करण्यात आले    आणि विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना आणि समितीला समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 
यामध्ये शिवजयंती उत्सव समिती दौंड, या समितीचा अखंड 50 वर्ष पारंपारिक पद्धतीने शिवजयंती साजरी करण्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.विविध क्षेत्रातील इतर मान्यवरांचा सत्कारही यावेळेस करण्यात आला. स्वप्निल शहा(धार्मिक), डॉ.विशाल मिसाळ(वैद्यकीय),योगिता रसाळ(सामाजिक),जयंत पवार(शैक्षणिक), मनोहर बोडके(पत्रकारिता), रवींद्र कांबळे (राजकीय),मंगेश साठे(गायन)सचिन कुलथे (सामाजिक) इत्यादी मान्यवरांना आपापल्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल समाजभूषण गुण गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.  कार्यक्रमाला माझी मंत्री बबनराव पाचपुते, लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू  कसबे, 
तात्यासाहेब काळे,यांच्यासह विविध क्षेत्रातील अधिकारी, मान्यवर, पक्षातील पदाधिकारीआणि मोठ्या संख्येने समाज उपस्थित होता.
आणि  हा कार्यक्रम नितीन तूपसौंदर्य-लहुजी यंग ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष,गणेश खुडे, आणि  त्याचप्रमाणे लहुजी यंग ब्रिगेडच्या सर्व कार्यकर्त्यांनी मदत केली.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!