अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई — गांज्याची विक्री करणारा रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Wednesday, 6 August 2025

अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई — गांज्याची विक्री करणारा रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद

पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहराच्या पथकाने मंतरवाडी, कात्रज रोड, मेट्रो मोटर्स समोर गांज्याची विक्री करणारा रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद केला. आरोपीकडून २६ किलो ८०० ग्रॅम गांजा, महिंद्र थार फोर व्हिलर व मोबाईल असा एकूण २१ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दि. ०४ ऑगस्ट २०२५ रोजी पथकाचे अधिकारी व अमलदार पेट्रोलिंग करत असताना संशयित अनिल उर्फ आण्णा सुभाष राख (वय ४६, रा. प्रगतीनगर, काळेपडळ, हडपसर) हा आपल्या काळ्या रंगाच्या महिंद्र थार गाडीत संशयास्पद परिस्थितीत बसलेला दिसला. झडतीत गाडीच्या मागील सीटवर पिवळसर हिरवट नायलॉनच्या पोत्यात भरलेले १५ पॅकेट गांजा (किंमत ५ लाख ३६ हजार रुपये) आढळला. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २४६/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब)(ii)(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उप आयुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र 
मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात सहा. पो.नि. अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार दयानंद तेलंगे, प्रविण उत्तेकर, विनायक साळवे, विशाल दळवी, सचिन माळवे, संदिप शिर्के, नागेश राख, नितिन जाधव, सुहास डोंगरे, विपुन गायकवाड, मारुती पारधी, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, अक्षय शिर्के तसेच फुरसुंगी पोलीस ठाण्याचे पो. उप.नि. माने, महिला पो. उप.नि. बेग, पो. अंमलदार कदम, गायकवाड यांचा समावेश होता.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!