मुंबईत कबुतरांना खायला टाकण्यास बंदी कायम! मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Thursday, 7 August 2025

मुंबईत कबुतरांना खायला टाकण्यास बंदी कायम! मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल

मुंबई : मुंबईतील कबुतर खान्यावरून सुरू असलेल्या वादावर उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवत कबुतरांना दाणे टाकण्यास मनाई केली असून कबुतरखाने सुरू राहणार नाहीत, हे स्पष्ट केले आहे. मुंबई पालिकेने नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन कबुतरखाना बंद करून दाणापाणी देणे 
थांबवले होते. या निर्णयानंतर जैन समाजाने आक्रमक भूमिका घेत प्रकरण थेट मुंबई उच्च न्यायालयात नेले होते. अखेर न्यायालयाने कबुतरखाना बंद ठेवण्याचा आधीचा निर्णय कायम ठेवला. दादरमधील कबुतरखान्यांवरील बंदी कायम ठेवताना न्यायालयाने नागरिकांचे आरोग्य हेच प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. दिलेल्या आदेशाचा अवमान होऊ नये, असा इशाराही कोर्टाने दिला. तसेच, निकालावर हरकत असल्यास कायदेशीर दाद मागण्याचे पर्याय 
उपलब्ध असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. पालिका कारवाईविरोधात जैन समाज आक्रमक होत ४ ऑगस्ट रोजी मोर्चा काढला होता. कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे श्वसनाचे आजार होतात, हे वरवरचे कारण असून मुंबईतील जागा व चौकांवर कब्जा करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप मोर्चादरम्यान करण्यात आला.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!