दोन हजारांची लाच भोवली : धुळे जिल्ह्यातील शिरपूर पंचायत समितीच्या तांत्रिक सहायकासह दोघे एसीबीच्या जाळ्यात. - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Friday, 8 August 2025

दोन हजारांची लाच भोवली : धुळे जिल्ह्यातील शिरपूर पंचायत समितीच्या तांत्रिक सहायकासह दोघे एसीबीच्या जाळ्यात.

धुळे (चंद्रशेखर अहिरराव) : रोजगार हमी योजना अंतर्गत विहिर अनुदानाचे उर्वरीत साडेतीन लाखांचे बिज मंजूर करण्यासाठी दोन हजारांची लाच मागून ती स्वीकारताना शिरपूर पंचायत समितीतील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे तांत्रिक सहाय्यक धीरज संजय भामरे,नरडाणा व तांत्रिक सहाय्यक सौरभ राजेंद्र ठाकरे, चोपडा यास धुळे एसीबीने लाच स्वीकारताच अटक केली.या कारवाईने शिरपूर पंचायत समितीतील लाचखोर हादरले आहेत.
४० वर्षीय तक्रारदाराची मौजे वकवाड येथे शेतजमीन आहे. या शेत जमिनीमध्ये तक्रारदाराला रोजगार हमी योजने अंतर्गत सन २०२३ - २४ मध्ये विहिरीसाठी चार लाखांचे अनुदान मंजूर झाले. विहिरीचे नियमानुसार काम पुर्ण झाले असून ५० हजारांचे अनुदान मिळाल्यानंतर उर्वरीत साडेतीन लाखांच्या अनुदानासाठी तक्रारदाराने शिरपूर पंचायत समितीत अभियंता धीरज भामरे यांची भेट घेतली. अनुदानाच्या मोबदल्यात व उर्वरीत 
अनुदानाचे बिल मंजुर करण्यासाठी दोन हजारांची लाच मागण्यात आल्याने १९ मे रोजी तक्रार देण्यात आली. पंचासमक्ष पडताळणी केली असता आरोपी भामरे याने दोन हजारांची लाच मागितले व स्वीकारण्याचे मान्य केले असल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!