स्वातंत्र्यदिनी रायगडमध्ये आदिती तटकरे तर नाशिकमध्ये गिरीश महाजन ध्वजारोहण करणार; शिवसेनेच्या पदरी निराशा - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Monday, 11 August 2025

स्वातंत्र्यदिनी रायगडमध्ये आदिती तटकरे तर नाशिकमध्ये गिरीश महाजन ध्वजारोहण करणार; शिवसेनेच्या पदरी निराशा

मुंबई (चंद्रशेखर अहिरराव धुळे) : रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीमधील वाद शिगेला पोहोचलेला असताना राज्य सरकारने परिपत्रक काढून १५ ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्यदिनी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी आदिती तटकरे याच ध्वजारोहण करणार 
असल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाने  स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाचा मान मिळेल, अशी आशा लावून बसलेल्या मंत्री भरत गोगावले यांना धक्का बसला आहे. तसेच भरतशेठ यांनीच पालकमंत्री होऊन ध्वजारोहण करावे, अशी इच्छा शिवसेनेतील अनेक नेते, मंत्री बोलून दाखवत होते. त्यांचीही इच्छा राज्य सरकारच्या परिपत्रकाने धुळीला मिळाली आहे.
रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत (अजितदादा गट) वाद आहे. भरत गोगावले आणि आदिती तटकरे या दोघांनीही हक्क सांगितल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी यांनी पालमंत्रिपदाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कोण करणार? असा प्रश्न उभा ठाकला होता. मात्र राज्य शासनाने परिपत्रक काढून आदिती तटकरे याच ध्वजारोहण करणार असल्याचे जाहीर केले आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून नुकतीच एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरे यांची दिल्लीत बैठक झाली होती. दोन्ही नेत्यांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. परंतु पालकमंत्रिपदावरील हक्क सोडण्यास तटकरे यांनी नकार दिला. 
त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रिपदावरचा तोडगा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच एकत्रित बसून काढावा, असे सेनेचे नेते बोलत असल्याची चर्चा आहे. नाशिकमध्येही पालकमंत्रिपदावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत जोरदार वाद सुरू आहे. गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकची जबाबदारी दिल्यानंतर शिवसेना शिंदे गटाने आक्षेप नोंदवला. ज्येष्ठ नेते दादा भुसे यांच्याकडे पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने केली. तर दुसरीकडे कुंभमेळ्याचे महत्व लक्षात घेऊन पालकमंत्रिपद सोडण्यास भाजपने नकार दिला. दोन्ही बाजूने वाद उफाळल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली. नाशिकमध्ये स्वातंत्र्यदिनी कोण ध्वजारोहण करणार, याची चर्चा सुरू असताना राज्य सरकारने परिपत्रक काढून गिरीश महाजन यांना ध्वजारोहणाचा मान दिला आहे.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!