साक्री तालुक्याच्या भाजप महिला आघाडी अध्यक्षपदी सौं.ऍड पूनम जगदीश शिंदे (काकूंस्ते) याची स्तुत्य निवड - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Monday, 11 August 2025

साक्री तालुक्याच्या भाजप महिला आघाडी अध्यक्षपदी सौं.ऍड पूनम जगदीश शिंदे (काकूंस्ते) याची स्तुत्य निवड

धुळे (चंद्रशेखर अहिरराव) : साक्री भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यातील प्रत्येक घराघरात महिला संघटन बळकट करण्याचे उदिष्ट समोर ठेवले आहे. त्या अनुषंगाने साक्री तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका अँड पूनम काकूस्ते (शिंदे) यांची भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष चित्राताई वाघ, धुळे जिल्हा पालक मंत्री जयकुमार रावल,  आमदार  अमरीशभाई पटेल, माजी मंत्री तथा तथा आमदार डॉ विजयकुमार गावित, खासदार डॉ. सुभाष भामरे, डॉ. हीना गावीत, आमदार अनुप अग्रवाल, धुळे जि.प.चे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते, भाजपा जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे. प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी जयश्री अहिरराव, धुळे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा धरती देवरे, माजी सभापती हर्षवर्धन दहिते, यांच्या मार्गदर्शनाने निवड  करण्यात आली.  या निमित्ताने साक्री तालुक्यातील राजकीय, सामाजिक अशा सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 
अँड पूनम काकूस्ते  या विधीक्षेत्रात पदार्पणाच्या आधीपासूनच विध्यार्थी दशेपासून अखिल भारतीय विध्यार्थी परिषदेत घडलेल्या असून. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील सक्रिय सदस्य आहेत. स्त्री शक्ती प्रतिष्ठान च्या माध्यमातून महिलांचे संघटन त्यांनी शहरासह तालुक्यात उभे केले आहे. राजकिय क्षेत्रात त्यांनी प्रवेश केल्यानंतर साक्री नगरपंचायतीत  २०१५ साली प्रथम अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आणि साक्री शहरात प्रामाणिक सामान्य कार्यकर्ता विजयी होवू शकतो हे सिद्ध केले. या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या एक जागेपासून निवडून येत सुरवात केली.या परिवर्तनात एकमेव विरोधी पक्ष सदस्य असल्यावरही त्यांनी प्रखर भूमिका मांडली तसेच प्रभागातील समस्याच्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळेच साक्री शहरात राजकीय बदल आणि परिवर्तन होऊ शकते हे जनतेच्या लक्षात आले.परिणामी २०२२ साली झालेल्या निवडणुकीत संपूर्ण भारतीय जनता पक्ष बहुमताने निवडून आला.  भारतीय जनता पक्षाशी प्रामाणिकपणे एकनिष्ठ आजवर राहिल्यामुळे मागील साडेतीन वर्ष भारतीय जनता पक्षाने साक्री नगरपंचायतीत स्वीकृत सदस्य म्हणून त्यांची नेमणूक केली. अँड काकूस्ते यांच्या निवडीच्या निमित्ताने सौ.काकुस्ते यांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील कामकाजामुळे साक्री तालुक्यातील महिला मतदार आणि कार्यकर्ते यांची फळी उभी राहणार आहे.साक्री तालुक्यातील महिला संघटन मजबूत करण्यासाठी पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने, व सहकार्याने भारतीय जनता पक्ष महिला आघाडी तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अँड पूनम काकूस्ते -  शिंदे यांनी आभार मानले आहेत.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!