शिरूर पोलीस स्टेशनतर्फे ‘हरीत महाराष्ट्र’ अभियानांतर्गत वृक्षारोपण - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Wednesday, 6 August 2025

शिरूर पोलीस स्टेशनतर्फे ‘हरीत महाराष्ट्र’ अभियानांतर्गत वृक्षारोपण

शिरूर :  हरीत महाराष्ट्र घडवण्यासाठी “वृक्षारोपण मोहिम – एक पाऊल पुढे” या अभियानांतर्गत शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम बसस्थानकाजवळील शिरूर पोलीस स्टेशनच्या नवीन इमारत परिसरात पार पडला.
या मोहिमेसाठी श्रीविश्वक फाउंडेशन तर्फे एकूण ७० झाडे देण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन शिरूर शहरातील प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. स्वप्निल भालेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी शिरूर शहर व परिसरातील 
राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या, पत्रकार व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
शिरूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी "माझं झाड, माझं कर्तव्य – वृक्षारोपणात सहभागी व्हा आणि पर्यावरण वाचवा" या 
संदेशाखाली प्रत्येकाने एक झाड लावले. लावलेल्या प्रत्येक झाडाची निगा राखण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तींना देण्यात आली असून, एकूण ७० झाडे दत्तक घेण्यात आली आहेत.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!