शेणपूर धाडणे नवडने फाट्यावर विद्यार्थ्यांना बस न थांबवल्याने गैरसोय. शासन परिपत्रकाचे उल्लंघन,साक्री आगारावर प्रश्नचिन्ह साक्री आगाराच्या चालक-वाहकांवर कारवाईची मागणी. - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Tuesday, 19 August 2025

शेणपूर धाडणे नवडने फाट्यावर विद्यार्थ्यांना बस न थांबवल्याने गैरसोय. शासन परिपत्रकाचे उल्लंघन,साक्री आगारावर प्रश्नचिन्ह साक्री आगाराच्या चालक-वाहकांवर कारवाईची मागणी.

धुळे (चंद्रशेखर अहिरराव) :  न्यू इंग्लिश स्कूल, साक्री येथील विद्यार्थ्यांना १८ ऑगस्ट २०२५ रोजी मोठी गैरसोय सहन करावी लागली. दुपारी ३.५५ वाजता शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी बसची प्रतीक्षा होती. मुसळधार पावसात विद्यार्थी शाळेजवळ उभे असताना जळगाव-पिंपळनेर (MH-14 LX-8744) ही साक्री आगाराची बस शाळेजवळून गेली; मात्र चालक व वाहक यांनी बस थांबविली नाही. परिणामी विद्यार्थी पावसात भिजून त्रस्त झाले.
शाळेचे मुख्याध्यापक यांनी या घटनेबाबत साक्री आगार प्रमुखांना लेखी तक्रार करून तातडीने कार्यवाहीची मागणी केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की साक्री -आगाराच्या सर्व बसेस शाळेजवळ थांबवून विद्यार्थ्यांच्या चढ-उताराची सोय केली
जावी. अन्यथा जबाबदार चालक व वाहकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने याबाबत स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे परिपत्रक क्र. १२/२०१८ दिनांक ०५/०६/२०१८ तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाबाबत
शासन निर्णय दिनांक १२/०७/२०१९ नुसार, संबंधित विभागातील बसेस शाळांजवळ थांबवणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन गंभीर मानले जाईल असे स्पष्टपणे नमूद आहे.
या घटनेनंतर पालक वर्गाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पालकांनी म्हटले की, "विद्यार्थ्यांना सुरक्षित प्रवासाचा हक्क असून बसचालक व वाहकांनी नियमांचे पालन केले नाही तर त्यांच्यावर तातडीने कारवाई व्हावी." काही पालकांनी अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी प्रवासी सेवा तपासनीसांनी नियमित पाहणी करावी, अशीही मागणी केली आहे.
शाळा व्यवस्थापन, शिक्षक व पालक यांच्या संयुक्त मागणीनुसार ही बाब आता गंभीर बनली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या अशा घटनांवर साक्री आगार प्रशासनाने त्वरित पावले उचलणे आवश्यक आहे.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!