राळेगाव खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात आकांक्षा कोहाड हिच्या हस्ते ध्वजारोहण, आकांक्षाचा केला सत्कार - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Thursday, 21 August 2025

राळेगाव खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात आकांक्षा कोहाड हिच्या हस्ते ध्वजारोहण, आकांक्षाचा केला सत्कार

यवतमाळ (बंडू भारसकरे) : राळेगाव तालुक्यातील वाढोणाबाजार येथील शेतकरी परिवारातील एका विद्यार्थिनीने न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव येथील शाळेत दहावीला शिकत असताना दहावीच्या परीक्षेत राळेगाव तालुक्यातून 96.40%गुण पटकाविला त्या एका विद्यार्थिनीला प्रोत्साहन देण्यासाठी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आकांक्षा कोहाड हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.सोबतच  तीला एक नोटबुक , शिल्ड आणि पेन देऊन सन्मानित करण्यात आले.त्यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मिलिंद इंगोले, डॉ. उगेमुगे,संचालक श्रावणसिंग वडते सर, अशोक काचोळे श्रीधर थुटुरकर,कवडूजी कांबळे, जितेंद्र कहूरके प्रविण झोटींग मनोज वर्मा, आगलावे महाराज, नगरसेवक मंगेश राऊत, नितीन कोमेरवार, राहुल बहाळे, संजय दुरबुडे, रमेश पेंदाम, विलास देशमुख, अरविंद खेडेकर, मनोज पेंदोर, दिलीप किन्नाके यांच्या सह व्यवस्थापक संजय जुमडे कर्मचारी गणेश हिवरकर सचिन बोरकर अवधूत शेराम रोशन शिवरकर तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!