निलेश लंके प्रतिष्ठान, एच व्ही देसाई हॉस्पिटल पुणे ,व मिलेनियम फाउंडेशन यावतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Saturday, 9 August 2025

निलेश लंके प्रतिष्ठान, एच व्ही देसाई हॉस्पिटल पुणे ,व मिलेनियम फाउंडेशन यावतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

रविवारी पोखरी येथे नेत्ररोग व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

पारनेर (अरुण बेलकर) : निलेश लंके प्रतिष्ठान संघर्ष ग्रुप एच व्ही देसाई हॉस्पिटल पुणे व मिलेनियम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोखरी येथे रंगदास स्वामी प्रांगणात रविवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायं ४ वाजेपर्यंत नेत्ररोग व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे ‌. आरोग्य तपासणी 
शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू ऑपरेशन, माफक दरात चष्मे वाटप करण्यात येणार आहे.रुग्णांचे ऑपरेशन पुण्यातील नामांकित एच व्ही देसाई हॉस्पिटल येथे करण्यात येईल. रुग्णांची येण्या जाण्याची, राहण्याची जेवणाची सोय मोफत करण्यात येणार आहे. 
मिलेनियम फाउंडेशन यांच्या सहकार्याने शिबिरातील रुग्णांचे जपानी टेक्नॉलॉजी मशीन च्या साह्याने फुल बॉडी चेकअप 40 प्रकारच्या तपासण्या मोफत करुण आरोग्य तपासणी अहवाल तात्काळ देण्यात येणार आहे. नेत्र तपासणी आरोग्य तपासणी शिबिरात पोखरी वारणवाडी कामटवाडी म्हसोबाझाप  ग्रामपंचायत मधील गरजू नागरिकांनी सहभागी होऊन आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन म्हसोबाझापचे आदर्श सरपंच प्रकाश गाजरे यांनी केले आहे


No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!