शेणपूर येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह उत्साहात साजरा भाविकांनी घेतला कीर्तनचा व महाप्रसादाचा लाभ - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Wednesday, 6 August 2025

शेणपूर येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह उत्साहात साजरा भाविकांनी घेतला कीर्तनचा व महाप्रसादाचा लाभ

धुळे (चंद्रशेखर अहिरराव) : ग्रंथराज  ज्ञानेश्वरी अखंड पारायण सप्ताह वर्ष वर्ष 18 वे मौजे शेणपूर येथे उत्साहात साजरा आज साप्ताहचा सातव्या दिवशी महाप्रसादाचा मान व आयोजन श्रीराम प्रति ष्ठान शेणपूर यांना होता त्यांनी तो मान यशस्वीरित्या पूर्ण केला तसेच श्री हरी पारायण सप्ताह चा 
सात दिवसाची कीर्तन सेवा श्री.बजरंग मित्र मंडळ शेणपूर यांची होती.त्यांनी देखील उत्कृष्ट नियोजन करून योग्य रित्या कार्यक्रम पार पडला.सर्व दात्याचे यथोचित सन्मान व स्वागत श्री.हरि भक्त पारायण मंडळ शेणपूर यांच्याकडून करण्यात आला.या हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात संपूर्ण गावातील अबाल वृद्धांसह बाल गोपाल मंडळी महिला यांचा मोठा सहभाग दिसून आला होता.आज चे काल्याचे कीर्तन सेवा ही ह.भ.प.जीवराम महाराज कापडणेकर यांचा दणदणीत कीर्तनाचा कार्यक्रम झाला.त्यांचे स्वागत व सत्कार श्री चंद्रशेखर अहिरराव (पत्रकार) शेणपूर यांचा हस्ते करण्यात आला.दर वर्षी सालाबादा प्रमाणे यावेळी पुढील वर्षाचा हरिनाम ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह साठी किर्तन सेवा ही श्रीराम प्रतिष्ठान शेणपूर व महाप्रसाद सेवा श्री सप्तशृंगी पदयात्री कावडी मंडळ शेणपूर यांनी घेतला आहे.याच कार्यक्रमात दरवर्षी प्रमाणे दहीहंडी फोडण्यासाठी बोली लावण्यात आली यावेळीचा दहीहंडी फोडण्याचा मान 11000 रु.मध्ये श्री.शिवाजी बाबुलाल आघाव शेणपूर.यांना 
मिळाला.या कार्यक्रमासाठी परिसरातील धाडणे नवडने चिकसे उंबरे उंबर्टी शेवडी पाडे मलांजन देगाव गव्हाणी पाडा इत्यादी गावांची ह भ प मंडळे उपस्थित होती त्यांचाही सन्मान व सत्कार श्रीफळ देऊन गावातील ज्येष्ठ ह भ प माळकरी यांच्या हस्ते करण्यात आला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!