स्वातंत्र्य दिनी मोदींकडून रोजगारासाठी नवा उपक्रम – ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’ सुरू - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Friday, 15 August 2025

स्वातंत्र्य दिनी मोदींकडून रोजगारासाठी नवा उपक्रम – ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’ सुरू

नवी दिल्ली :  ७९ वा स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर आज (१५ ऑगस्ट २०२५) लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित केले. भाषणात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले, ज्यामध्ये ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’ ही तरुणांसाठीची मोठी योजना आजपासून लागू होत असल्याची घोषणा सर्वांचे लक्ष वेधून घेतली.
मोदी म्हणाले की, "भारत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याच्या ध्येयाकडे वाटचाल करत आहे. रोजगार, उद्योजकता आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकार नवे उपक्रम राबवत आहे."

योजनेचे स्वरूप – खासगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना १५,००० रुपयांची आर्थिक मदत मिळेल. तसेच कंपन्यांना रोजगार निर्मितीसाठी विशेष प्रोत्साहन दिले जाणार आहे. या योजनेसाठी एक लाख कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

लाभार्थी – अंदाजे ३.५ कोटी तरुणांना या योजनेचा थेट फायदा होईल, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

आगामी घोषणा – मोदी यांनी सांगितले की, येत्या दिवाळीत जीएसटीमधील पुढील पिढीच्या सुधारणा जाहीर केल्या जातील, ज्यामुळे करभार कमी होईल आणि व्यापाराला चालना मिळेल.
शेतकरी, मच्छीमार, पशुपालकांसाठी आश्वासन – पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, "शेतकरी, मच्छीमार किंवा पशुपालकांच्या हिताच्या विरोधात कोणतेही धोरण आले तर मोदी त्यांच्यासाठी भिंतीसारखा उभा राहील."


No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!