गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिर नारायणगाव येथे प्रयोगशाळा परिचर रघुनाथ पवार यांच्या हस्ते झेंडावंदन संपन्न - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Wednesday, 13 August 2025

गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिर नारायणगाव येथे प्रयोगशाळा परिचर रघुनाथ पवार यांच्या हस्ते झेंडावंदन संपन्न


निर्वी (शकील मणियार) :  महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार प्रथमच शाळांमध्ये सलग तीन दिवस झेंडावंदन करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत, केंद्र शासनाने "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा" हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हा परिषद व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या आदेशाने दिनांक 12 ऑगस्ट रोजी  उपक्रम राबविण्याचा आदेश काढण्यात आला.  दिनांक 13  ते 15 ऑगस्ट 
या कालावधीत ध्वजारोहण करण्याचे आयोजन गुरुवर्य  रा .प. सबनीस   विद्यामंदिर  येथे करण्यात आले आहे.  त्यानुसार विद्यामंदिराचे आदर्श प्रयोगशाळा परिचर रघुनाथ पवार यांच्या शुभहस्ते दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी ध्वजारोहण करण्यात आले. उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठे  ग्रामोन्नती मंडळाचे ,गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिर हे शैक्षणिक संकुल आहे.  या विद्यामंदिराचा शैक्षणिक क्षेत्रात फार मोठा नावलौकिक आहे. 
या विद्यामंदिरात  रघुनाथ पवार हे सन 1990 पासून कार्यरत आहेत 36 वर्ष त्यांनी विद्यामंदिरामध्ये  सेवा केली आहे.  रघुनाथ पवार यांनी आपला सेवाकाल प्रामाणिकपणे पूर्ण केला आहे.    31 मार्च 2026 रोजी ते सेवानिवृत्त होत असल्याने, त्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण  करण्यात आले.  या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका सौ. सुषमा वाळिंबे, पर्यवेक्षिका श्रीमती मानसी भालेराव, क्रीडाशिक्षक कावजी भवारी सर,.अजय कानडे सर, पी एस कडाळे सर, सु.शि.दुबळे सर, सु.रा. रोकडे सर आणि सर्व शिक्षक, सेवक आणि विद्यार्थी  उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!