माळमाथा काठवाण सह साक्री तालुक्यातील पावसाची प्रतीक्षा पिके वाया जाण्याची भीती,शेतकरी हवालदिल. - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Tuesday, 12 August 2025

माळमाथा काठवाण सह साक्री तालुक्यातील पावसाची प्रतीक्षा पिके वाया जाण्याची भीती,शेतकरी हवालदिल.

धुळे (चंद्रशेखर अहिरराव) : साक्री तालुक्यातील परिसरात श्रावण महिना अर्धा उलटूनही दमदार पावसाची सरशी न झाल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गात प्रचंड चिंता पसरली आहे. नद्या नाले, तलाव आणि लहान धरणे कोरडी पडली असून विहिरी व कुपनलिकांनी तळ गाठल्याने पाणीटंचाई तीव्र झाली आहे. असे दिसून येते आहे पारंपरिक पावसाळी हवामाना ऐवजी जुलै सह ऑगस्ट महिन्यात कडक उन्हाचा तडाखा बसत असल्याने खरीप पिके करपण्याच्या मार्गावर आहेत.
मका, बाजरी, कपाशी, सोयाबीन, उडीद, मूग, कांदा अशा पिकांना पुरेसा ओलावा मिळत नसल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पिके मरगळलेल्या अवस्थेत असून पाने पिवळी पडू लागली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे अजूनही विहिरी किंवा कुपनलिकांत थोडेफार पाणी शिल्लक आहे, ते पिके वाचवण्यासाठी प्राणपणाने प्रयत्न करत आहेत. मात्र पावसाअभावी ही साधने देखील लवकरच निकामी ठरण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी कर्ज काढून बियाणे, खते व औषधे विकत घेतली. त्यावर मोठा खर्च केला, परंतु पिकांचे भविष्य अनिश्चित झाले आहे. काही शेतात उन्हाच्या तडाख्याने पिके मानाखाली झुकू लागली असून, पिकांची वाढ थांबली आहे. जर उत्पन्न घटले तर संपूर्ण गुंतवणूक पाण्यात जाणार आहे. त्यामुळे मानसिक ताण, आर्थिक ओझे आणि हवामानातील अनिश्चितता या तिहेरी संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे. पुढील आठवड्यात पाऊस आला नाही तर बहुतेक पिके वाया जाणार आहेत. अशा स्थितीत शासनाने तातडीने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मदत जाहीर करावी, सिंचनासाठी पर्यायी उपाययोजना कराव्यात आणि दुष्काळी स्थिती टाळण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी परिसरातून होत आहे.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!