उत्तम अर्थउन्नतीसाठी संस्कारयुक्त सहकाराची आवश्यकता सहकार भारतीचे अखिल भारतीय संघटनमंत्री संजय पाचपोर : डॉ. हेडगेवार नागरी सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Saturday, 2 August 2025

उत्तम अर्थउन्नतीसाठी संस्कारयुक्त सहकाराची आवश्यकता सहकार भारतीचे अखिल भारतीय संघटनमंत्री संजय पाचपोर : डॉ. हेडगेवार नागरी सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन

सोलापूर (सिद्धांत बाबरे) : समाजातील सर्व स्तरातील घटकांची आर्थिक उन्नती व्हावी हे सहकार तत्वाला अपेक्षित आहे. उत्तम अर्थउन्नतीसाठी संस्कारयुक्त सहकाराची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन सहकार भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री संजय पाचपोर यांनी केले. डॉ. हेडगेवार नागरी सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन शनिवारी संजय पाचपोर यांच्या हस्ते शिवस्मारक सभागृहात झाले. 
याप्रसंगी व्यासपीठावर पतसंस्थेचे अध्यक्ष उमाकांत चाफेकर, उपाध्यक्ष प्रभाकर बाबरे, सचिव सतीश कुदळे, संचालिका अश्विनी चव्हाण, वंदना करजगीकर, रत्नमाला पाटील, संचालक ॲड. संतोष न्हावकर, डॉ. उदय वैद्य, डॉ. महेश पवार, राहुल माळी, गणेश वास्ते उपस्थित होते.
प्रारंभी दीपप्रज्वलन आणि भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन सहकार भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री संजय पाचपोर यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर संजय पाचपोर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक सी.ए. सुनील इंगळे यांच्या हस्ते फीत कापून पतसंस्थेचे उद्घाटन झाले.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यवाह मुकुंदराव कुलकर्णी, जिल्हा कार्यवाह सी.ए. ऋषिकेश कुलकर्णी, सहकार भारतीचे विभाग संघटक संतोष गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. पाचपोर म्हणाले, ज्या सहकारी संस्थांमध्ये संस्कारांचा अभाव होता त्या संस्था मोडकळीस निघाल्या. त्यामुळे सहकारी क्षेत्रातील संस्थांमध्ये संचालक आणि सभासद देखील प्रशिक्षित व संस्कारित असण्याची अत्यंत आवश्यकता आहे. सहकारी चळवळीच्या माध्यमातून महिला आत्मनिर्भर झाल्या तर कुटुंब सांभाळण्यासाठी त्या आणखी सक्षम होतील. अमूल कंपनी ही सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या संस्थांसमोर आदर्श उदाहरण म्हणून पाहता येईल, असेही श्री. पाचपोर याप्रसंगी म्हणाले. पतसंस्थेचे संचालक उदय वैद्य यांनी प्रास्ताविक केले. संचालिका वंदना करजगीकर यांनी सूत्रसंचालन तर अध्यक्ष उमाकांत चाफेकर यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास सहकार चळवळीतील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!