शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री.नागेश्वर मंदिरास दुग्धाभिषेक व निवारा बालग्रहात विद्यार्थ्यांना खाऊंचे वाटप - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Sunday, 27 July 2025

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री.नागेश्वर मंदिरास दुग्धाभिषेक व निवारा बालग्रहात विद्यार्थ्यांना खाऊंचे वाटप

सणसवाडी (रिजवान बागवान) : शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंञी उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येंने उपस्थित होते.उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड शहरातील श्री.नागेश्वर मंदिरात दुग्धाभिषेक 
करण्यात आला.तसेच जामखेड येथील ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालग्रह याठिकाणी हक्काच शिक्षण घेत असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना खाऊंचे वाटप करण्यात आले.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख ऐडवोकेट मयुर डोके पा.युवासेना तालुका उपप्रमुख पै.सुहास मदने,शिवसैनिक मोहन जाधव,नागराज जंगम,अरविंद ठाकरे,सागर गुंदेजा,कृष्णा रंधवे,भारत पवार,तय्यब बागवान,महेश मुरूमकर,ओम सानप आदि.पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येंने उपस्थित होते.या उपक्रमाचे ग्रामीण विकास केंद्र 
जामखेड यांनी जामखेड तालुका शिवसेनेचे आभार मानले असुन निवारा बालग्रहातील विद्यार्थ्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त मनपुर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!