समाज कल्याण केंद्र, दक्षिण सोलापूर येथे जल जीवन मिशन प्रशिक्षण उत्साहात संपन्न - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Thursday, 24 July 2025

समाज कल्याण केंद्र, दक्षिण सोलापूर येथे जल जीवन मिशन प्रशिक्षण उत्साहात संपन्न

सोलापूर ( सिद्धांत बाबरे)  : केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी जल जीवन मिशन अंतर्गत स्रोत बाळकटीकरण व शाश्वतीकरण विषयक प्रशिक्षण कार्यक्रम समाज कल्याण केंद्र, दक्षिण सोलापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या प्रशिक्षणाचे आयोजन जिल्हा परिषद सोलापूर, पंचायत समिती दक्षिण सोलापूर, पृथ्वीसंग्राम ग्रामविकास संस्था, कडेपूर (जि. सांगली) व परिश्रम ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. प्रशिक्षणादरम्यान गटचर्चा, खेळ, गाणी यांसारख्या रचनात्मक माध्यमातून प्रशिक्षणार्थिनींनी उस्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमास यशदा प्रशिक्षक भीमराव तुळजापूरे, सौदागर देवघन, उषा चव्हाण, कल्पना चव्हाण, सिद्धांत बाबरे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रम गटविकास अधिकारी श्री. शंकर कवितके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. प्रशिक्षण उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब यादव, विस्तार अधिकारी खरबस सर, जिल्हा समन्वयक रजाक शेख, मुबारक शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शंकर बंडगर (HRD), पाणी गुणवत्ता सल्लागार सोनल कुलकर्णी, तालुका समन्वयक गौरी तुप्पे, दीपाली दिंडे, मानकेश्वर वाघे, विकास कानकुर्ती यांचे मोलाचे योगदान लाभले. पंचायत समिती दक्षिण सोलापूर यांचेही विशेष सहकार्य लाभले.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!