स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंच्या कलागुणांना वाव देणारा योध्दा : प्रा. के.महानोर - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Tuesday, 22 July 2025

स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंच्या कलागुणांना वाव देणारा योध्दा : प्रा. के.महानोर



टाकळी हाजी (शेख शौकत मुजावर)  :  स्पर्धेच्या युगात ग्रामीण खेळाडूंना गरीब परिस्थिती च्या कारणाने टिकणे कठीन आसते, विविध स्पर्धा अयोजीत होत आसतात परंतु साई मल्हार शोतोकॉन कराटे डो असो. ऑफ इंडिया चे अध्यक्ष प्राध्यापक कैलास महानोर यांनी राज्यस्तरीय कराटे स्पर्धा ग्रामीण भागात आयोजीत करत खेळाडूंना नव संदेश देण्याचे काम करत आहे. प्रंचड दांडगा संपर्क,जीवापाड जपणारा मित्रवर्ग हा त्यांच्यासाठी मिळालेल वरदानच दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस अनेक विद्यार्थ्याना ज्ञानदान देण्याचे काम करत आहेखेळाडूंना केंद्रबिंदू माणून त्यांनी दिनांक २७ रविवार रोजी स्पर्धेचे आयोजन करत विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या कार्याची दखल घेत त्यांना पुरस्कार देवून सन्मानित करणार आसल्या ची माहिती देत राज्यातील अनेक कराटे प्रशिक्षक यांना खेळाडूच्या कला गुणांना वाव देण्यासाठी सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहेएक मुरंबी योध्दा असलेले प्राध्यापक कैलास महानोर यांनी ग्रामीण भागात स्वसंरक्षण कलेला वाव दिल्याने त्यांची प्रशंसा होत आहे.
बेटी बचाओ बेटी पढाओ असा संदेश देत त्यांनी त्यांच्या नक्षत्रा, सुलक्षना, पूर्वा या तिन्ही कन्यांना उच्च शिक्षण देत स्वसंरक्षण कलेत प्रविण केले असुन या तिन्ही कन्यारत्न त्यांच्या खाद्याला खांदा लावून त्यांच्या बरोबरीने स्वसंरक्षण कलेचा प्रचार प्रसार करत आहेत. ही स्पर्धा मा.ना. श्री. दत्तात्रय भरणे क्रिडा व युवक कल्याणमंत्री यांच्या 
अध्यक्षतेखाली तसेच मा.श्री.विश्वसराव देवकाते मा. अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे,मा.श्री. आनंद काकासाहेब थोरात मा.व्हा. चेअरमन भिमा सह.सा.का.पाटस यांच्या शुभहस्ते होणार असुन श्री. दत्तात्रय काळे,श्री.सुहास डोंबाळे पाटील, श्री.जगन्नाथ लकडे सर,ॲड विकास घनवट हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
राज्यस्तरीय स्पर्धा यशस्वी व्हावी म्हणून त्यांचे सहकारी स्वप्नील भागवत,सचिन राऊत,दत्ता देशमुख, हेमंत महानोर,अक्षय धनवटे,प्रिया राऊत,नक्षत्रा महानोर सत्यजित देसाई सह संपूर्ण जिल्हाप्रमुख,ब्लॅक बेल्ट व्होल्डर विद्यार्थी पंच समिती हे नियोजन करत आहेत.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!