वाको इंडिया खेळ विश्वात प्रेरणादायी,राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र किकबॉक्सिंग खेळाडू चमकले ! - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Thursday, 24 July 2025

वाको इंडिया खेळ विश्वात प्रेरणादायी,राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र किकबॉक्सिंग खेळाडू चमकले !


टाकळी हाजी (शेख शौकत मुजावर) :  खेळ जगतात विश्वात नावजलेली वाको इंडिया देशभरातील खेळाडून साठी प्रेरणादायी आसुन त्यांच्या मार्फत आयोजीत राष्ट्रीय सीनियर आणि मास्टर्स किक बॉक्सिंग स्पर्धा बलबीर सिंग इनडोअर स्टेडीयम रायपूर, छत्तीसगड मध्ये दिनांक १६जुलै ते २० जुलै २०२५ रोजी संपन्न झाल्या. पाच दिवसीय स्पर्धेत देशभरातील ३३ राज्यांतील १२०० खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील किक बॉक्सिंग स्पोर्टस असो.अध्यक्ष श्री. निलेश शेलार यांच्या मार्गदर्शना खाली  खेळाडूंनी आपली चुणूक दाखवत दमदार कामगिरी करत महाराष्ट्र राज्याला २१ सुवर्ण पदक,१६ रजत पदक,२९ कास्य 
पदक पटकवत द्वितीय स्थान प्राप्त करत राज्याचे नाव खेळाडूंनी चमकवले आहे. या स्पर्धेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून छत्तीसगड चे मुख्यमंत्री विष्णू देव शाय उपस्थित होते त्यांच्या हस्ते महाराष्ट्र टीमला सन्मानित करण्यात आले, वाको इंडिया किक बॉक्सिंग फेडरेशनच्या अध्यक्ष श्री संतोष कुमार अग्रवाल यांनी महाराष्ट्राचे अभिनंदन तसेच भरभरून कौतुक करत महाराष्ट्र राज्यात उत्कृष्ठ खेळाडू घडत आसल्याचे सांगितले.
राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातील शहर नव्हे तर ग्रामीण भागातील खेळाडूंनी चांगली कामगिरी करत महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले असुन शहरासह ग्रामीण भागात गावोगावी किकबॉक्सिंग खेळाचा प्रसार होत असुन जास्तीत जास्त खेळाडू सहभागी होत असल्याचे किक बॉक्सिंग स्पोर्टस असो.महाराष्ट्र अध्यक्ष निलेश शेयार यांनी सांगितले.
या स्पर्धेत महाराष्ट्र सचिव धीरज वाघमारे वरिष्ठ उपाध्यक्ष सूर्यप्रकाश मुंडापत,ततामी चेअरमन श्री सतीश राजहंस,सहसचिव श्री विशाल सिंग, आंतरराष्ट्रीय पंच मकरंद जोशी,
प्रशांत कांबळे,विघ्नेश मुरकर, संगीता सुरळकर, राष्ट्रीयपंच ज्योती गोदावरीकर, नंदिनी मनकट्टी महाराष्ट्राचे कोच म्हणून दीपा गवळे, वेदांत 
दीक्षित, अभिजीत पारगावकर आशिष राणे,शैलेश ठाकूर यांनी खेळाडूंना मोलाचे सहकार्य करत मार्गदर्शन केले.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!