राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे नाव देशभरात गाजले! - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Tuesday, 2 September 2025

राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे नाव देशभरात गाजले!

टाकळी हाजी (शेख शौकत मुजावर) : वाको इंडिया किक बॉक्सिंग फेडरेशन तसेच तामिळनाडू किक बॉक्सिंग असो. यांच्या सयुक्त विद्यमाने राष्ट्रीय किकबॉक्सिंग चिल्ड्रेन आणि कॅडेट स्पर्धा तामिळनाडू चेन्नई येथे दि.२७ ते३१ ऑगस्ट दरम्यान तामिळनाडू किकबॉक्सिंग असो.सचिव सुरेश बाबू यांनी अयोजन मोठ्या उत्साहात संपन्न केले.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूनी आपली चुनूक दाखवत महाराष्ट्र राज्यासाठी विजयश्री खेचून प्रथम क्रमांक पटकवले,यामध्ये महाराष्ट्र राज्यातुन १८० खेळाडूंनी सहभाग घेतला तसेच५ रेफ्री२२ कोच यांच्या मार्गदर्शनाखाली ४८ सुवर्ण,३९रौप्य, ६७ कास्यपदक प्राप्त करत महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांकाचा मान मिळवत देशात महाराष्ट्र राज्याचे नाव सुवर्ण आक्षरात कोरले आहे.
किक बॉक्सिंग स्पोर्ट असो.महाराष्ट्र राज्य अध्यक्ष निलेश शेलार यांनी राज्यातून आलेल्या ग्रामीण खेळाडूंना मार्गदर्शन करत म्हणाले हिम्मत एवढी ठेवा की,तिच्यासमोर नशिबालाही झुकावे लागेल,सर्व खेळाडूनी आज राज्याचे नाव देश पातळीवर गाजवले ही कौतुकस्पद असुन असेच महाराष्ट्राचे नाव पुढे गाजवावे. सुर्यप्रकाश मुंडपात आंतरराष्ट्रीय रेफ्री,सतिश राजहंस, कृष्णा ढोबळे,अनंत पंचकवडे,
ज्योती गोदाविकर यांनी पंच म्हणून काम पाहिले तसेच महाराष्ट्राचे कोच म्हणून ओमकार राठोड,दीपा गावळे संगीता सुरळकर,प्रकाश निराळे,राम सोनुवने,किरण गावळे,शुभम सोनवणे,कौस्तुभ अडक,सचिन मकासरे,यादव लालू या प्रशिक्षकानी
खेळाडूना प्रशिक्षण दिले.शुभम मिश्रा यांनी कोचेस यांना मार्गदर्शन केले,सर्व खेळाडूंना वेळेवरती तयार करणारे विशाल सिंग,महाराष्ट्र कोच रुपेश परदेशी यांनी काम पाहिले,सर्व खेळाडूचा स्पोर्ट डाटा एन्ट्रीकरण्यास  महाराष्ट्र सचिव धीरज वाघमारे यांनी मोलाचे कार्य केले,मकरंद जोशी शिवानी राजहंस,नंदीनी मनकंटी यांनी सर्व खेळाडूंना वेळोवेळी संपर्क करून सुचना दिल्या. सर्व यशस्वी खेळाडूना वाको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष संतोष आगरवाल,महाराष्ट्र राज्याचे चेअरमन संतोष बारणे यांनी स्वागत करत शुभेच्छा दिल्या.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!