रक्षाबंधनाचा उत्सव शिक्रापूर पोलीस ठाण्यात उत्साहात साजरा - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Saturday, 9 August 2025

रक्षाबंधनाचा उत्सव शिक्रापूर पोलीस ठाण्यात उत्साहात साजरा

यश कीर्ती सामाजिक संस्था व दक्षता समितीच्या महिला पोलीस बांधवांच्या सेवेला सलाम

निर्वी (शकील मनियार) : राखीचा सण म्हणजे भावंडांमधील प्रेम, जिव्हाळा आणि संरक्षणाचे प्रतीक. याच भावनेने प्रेरित होऊन   द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. मंगल सतीश सासवडे यांच्या प्रेरणेतून कार्यरत ‘यश कीर्ती सामाजिक संस्था’ व दक्षता समितीच्या सर्व महिलांनी मिळून शिक्रापूर पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचा पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
या कार्यक्रमामध्ये संस्थेच्या सचिव वैशाली खेडकर, सामाजिक कार्यकर्त्या सुनिता शिंदे, सुमन माने, उषा कळमकर, तसेच मनीष गडदे, यांनी पुढाकार घेत उपस्थित पोलीस निरीक्षक दीप रत्न गायकवाड, एपीआय, पीएसआय तसेच सर्व पोलीस कर्मचारी व ठाणे आमदारांच्या उपस्थितीत राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले.
या राखी सोहळ्यात महिलांनी पोलीस बांधवांना ओवाळून त्यांच्यावरील विश्वास आणि कृतज्ञता व्यक्त केली. पोलीस विभाग रात्रंदिवस समाजाच्या सुरक्षिततेसाठी जे कार्य करत आहे, त्याबद्दल महिलांनी विशेष गौरव व्यक्त केला.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखीच्या धाग्याने सामाजिक सुरक्षा, प्रेम व एकात्मतेचे सुंदर नाते निर्माण झाले. हा कार्यक्रम केवळ रक्षाबंधन साजरे करण्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर त्यातून पोलीस आणि समाज यांच्यातील बंध अधिक दृढ होण्याचा संदेश ही मिळाला.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!