साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील, मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Tuesday, 5 August 2025

साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील, मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

धुळे (चंद्रशेखर अहिरराव) : साक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प. तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना आवश्यक वेळी मदतीचा हात मिळणार आहे. शववाहिनीचे लोकार्पण करण्यात आले.
भाजपाचे प्रांतिक सदस्य सुरेश रामराव पाटील व त्यांच्या पत्नी माजी सभापती मंगलाताई पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व रिबीन कापून करण्यात आले. नगरपंचायतीच्या जलशुद्धीकरण कें द्राजवळ झालेल्या या कार्यक्रमाला नगराध्यक्ष उषाताई पवार, गटनेते बापूसाहेब गीते,
पाणीपुरवठा सभापती दीपक वाघ, नगरसेवक अॅड. गजेंद्र भोसले, विरोधी पक्षनेते पंकज मराठे, नगरसेवक सुमित नागरे, राहुल भोसले, प्रवीण निकुंभ, संगीता भावसार, रेखा सोनवणे, जयश्री पगारिया, स्विकृत नगरसेवक पंकज हिरे, अॅड. सूर्यकांत सोनार, विजय भोसले, आबा सोनवणे, अनिल पवार, विनोद पगारिया, याकूब पठाण, महेंद्र देसले, स्वप्निल भावसार, योगेश चौधरी, कुणाल देशमुख तसेच आरोग्य निरीक्षक रुपेश पाटील, लिपिक जयदीप आव्हाड, मुकादम कर्मचारी रवींद्र चव्हाण, पंडित चव्हाण, निलेश राठोड व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!