नरेश्वर कुस्ती केंद्र ग्रामीण भागातील मल्लांना एक वरदान : वस्ताद योगेश भांडवलकर - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Sunday, 17 August 2025

नरेश्वर कुस्ती केंद्र ग्रामीण भागातील मल्लांना एक वरदान : वस्ताद योगेश भांडवलकर


टाकळी हाजी (शेख शौकत मुजावर) : खेळ मातीचा अन डाव मर्दाचा या उक्ती प्रमाणे कोरेगाव भिमा येथील नरेश्वर वस्ती येथील नरेश्वर कुस्ती केंद्र पुणे जिल्हयात नव्हे तर महाराष्ट्रात ओळख निर्माण करणाऱ्या यशस्वी मल्लानचे पाया रचणारे केंद्र याची स्थापना केली सर्वसामान्य कुटूंबातील वस्ताद योगेश भांडवलकर यांनी वंशपरापरागत कुस्तीचा वारसा मिळालेल्या या औलियाने ग्रामीण भागातील मल्ल घडावा म्हणून ध्येयाने झपाटलेल्या या ग्रामीण मल्ला 

ने स्वताःच्या जागेत एका पत्र्याच्या शेडमध्ये तालीम तयार करुण लालमातीतील पैलावान घडवण्यास सुरुवात केली. दिवसोदिवस या खेळात बदल होणारा पाहून ग्रामीण मल्ल मागे राहू नये म्हणून मॅट वरील कुस्तीस सुरुवात केली. त्यांनी ग्रामीण भागातील मुलींनाही 

कुस्ती खेळास प्राधान्य दिले. आज महाराष्ट्र राज्य नव्हे तर राष्ट्रीय स्तरापर्यत मजल मारणारे असंख्य पैलवान मुले मुली घडवण्याचे काम ते आपला मुलगा श्रीकांत भांडवलकर  याच्या सह करत आहेत. कुस्ती प्रकार कोणताही असो त्यांचे मल्ल हे अव्वलच आसतात.आज त्यांच्या आखाड्यात कुस्ती क्षेत्रात नावाजलेल्या मुली सराव करत असुन राष्ट्रीय स्तरापर्यंत त्यांनी आपले कौशल्य महाराष्ट्र राज्यातील असंख्य खेळाडूंना दाखवून दिले आहे.

वस्ताद योगेश भांडवलकर हे कुस्तीच्या दुनियेतील तसेच मल्लांच्या हृदययात जागा निर्माण करणारा राजा माणूस म्हणून परिचित आहे. त्यांच्या कार्याची चर्चा पुणे जिल्हा नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील मल्लांच्या तोंडून नेहमीच गायली जात आहे.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!