तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत बालाजी इंग्लिश मिडियम स्कूल प्रथम! - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Wednesday, 3 September 2025

तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत बालाजी इंग्लिश मिडियम स्कूल प्रथम!

टाकळी हाजी : क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र पुणे व जिल्हा क्रीडा परिषद आयोजित तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धा शिरूर येथे यशस्वीरित्या पार पडली.या स्पर्धेत १४वर्षाखालील वयोगटांत बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या बालाजी स्कूल ने बाजी मारली. इब्रान 
खान,फैजान पठाण, स्वराज काळे,साईराज हिंगे,रुद्र परदेशी,चिन्मय चत्तर,योगीराज चौधरी,आयुष घावटे,स्वराज जगताप संग्राम चौरे,विश्वास शिरसाठ,स्वराज थोरात,आद्य अचपळ,सार्थक झांबरे, उत्तम देवासी यांच्या संघाने क्रिडा शिक्षक सतिश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला.यशस्वी संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना चषक व सन्मानपत्र देण्यात आले. 
शाळेचे संस्थापक सदाशिव आण्णा पवार,प्राचार्य मनमीत चौरे,शिक्षक, पालक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!