भाजपचे पुन्हा एकदा धक्कातंत्र; उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा. - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Sunday, 17 August 2025

भाजपचे पुन्हा एकदा धक्कातंत्र; उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा.

नवीदिल्ली  (चंद्रशेखर अहिरराव धुळे) : उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या राजीनाम्यानंतर भाजपकडून उपराष्ट्रपती पदासाठीची उमेदवारी कोणाला दिली जाईल, याची चर्चा देशभरात रंगली होती. अखेर भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्र देत उपराष्ट्रपदीपदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राधाकृष्णन हे भाजपचे उपराष्ट्रपदी पदाचे उमेदवार असतील, असे जाहीर केले. त्यामुळे, आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे. 
भाजपनं उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचं नाव निश्चित केलं आहे. सीपी राधाकृष्णन यांना एनडीएनं उमेदवारी जाहीर केली आहे. यापूर्वीचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे देखील राज्यपाल पदावरुन उपराष्ट्रपती बनले होते. सीपी राधाकृष्णन हे मूळचे तामिळनाडूचे आहेत. सीपी राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल देखील होते. यापूर्वी राधाकृष्णन यांनी तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल होते. सीपी राधाकृष्णन हे दोनवेळा लोकसभेवर निवडून आले होते, अशी माहिती जे. पी. नड्डा यांनी दिली आहे.




No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!