शिरूर पोलीसांची धडाकेबाज कारवाई – पेट्रोल पंपावरील रोकड चोरून पळालेल्या कामगाराला गुजरातमधून अटक - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Monday, 18 August 2025

शिरूर पोलीसांची धडाकेबाज कारवाई – पेट्रोल पंपावरील रोकड चोरून पळालेल्या कामगाराला गुजरातमधून अटक

शिरूर : शिरूर तालुक्यातील मौजे निमोणे येथील गुनाट रोडवरील एच. पी. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगारांनी पेट्रोल पंपावरील रोकड ₹९४,५२०/- चोरून फरार झाले होते. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ५३३/२०२५ भा.दं.वि. कलम ३०६, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरी प्रकरणातील आरोपींमध्ये रामेश्वर हरीश्चंद्र गोंड (रा. देवरी, जि. रामसेन, मध्यप्रदेश), रमण सिताराम ठाकुर (रा. बदनपुर बरेली, जि. नरसिंगपूर, मध्यप्रदेश), सोनु ठाकुर (पूर्ण नाव माहिती नाही, रा. हातीडोल, जि. रामसेन, मध्यप्रदेश) व एक विधीसंघर्षित बालकाचा समावेश आहे.
मुख्य आरोपी रामेश्वर गोंड गुजरात राज्यातील मोरबी जिल्ह्यातील साखोडा येथे काम करत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवालदार प्रताप टेंगले, नाथसाहेब जगताप, अंमलदार अजय पाटील यांनी मोरबी (गुजरात) येथे धाड टाकून स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक केली. आरोपीस न्यायालयात (दि. १८ ऑगस्ट) हजर केले असता न्यायालयाने त्यास कोठडी रिमांड मंजूर केली. तर विधीसंघर्षित बालकाला बालन्याय मंडळ, येरवडा (पुणे) येथे हजर करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे व श्री. संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!